सायबर गुन्हेगारी…
लॉकडाऊनमुळे सध्या ऑनलाईनची चलती आहे. बहुतांश कामे ही ऑनलाईन पध्दतीने होवू लागली आहेत. या कालावधीत अनेक नव्या युझर्सचीही भर पडली आहे. त्यामुळे सायबर क्राईम करणार्यांचे चांगले फावले आहे. टाळेबंदीमध्ये सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे.
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात 470 गुन्हे दाखल झाले असून 255 व्यक्तींना अटक केली आहे.
यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण 470 गुन्ह्यांची (ज्यापैकी 31 छ.उ आहेत) नोंद 10 जून 2020 पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 194 गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी 191 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 23 गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 8 गुन्हे दाखल झाले आहेत, इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत.
तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी 50 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 255 आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी 107 आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन (ींरज्ञशवेुप) करण्यात यश आले आहे . लॉकडाऊनच्या काळात डिजीटल पेमेंट मोठ्या प्रमाणात झाले.
यामुळे थेट बँकेत जाणे कमी झाले वा रोखीचे व्यवहार कमी झाले. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्यासाठी सध्या ऑनलाईन बाजारात अनेक प्रकारच्या अॅप्सची सुविधा आहे. यातही गूगल पे, फोन पे, भीम अॅप आणि प्रत्येक बँकेची ऑनलाईन मोबाईल सेवा कार्यरत आहे.
पंतप्रधान सहाय्यता निधी या खात्याच्या नावाची किमान 500 बनावट खाती तयार झाल्याचे सायबर सुरक्षा विभागाच्या निर्दशनास आले होते. या बनावट खात्यांच्या लिंकमध्ये अनेकांनी सहायता निधी थेट आपल्या व्यक्तिगत बँक खात्यातून पाठवला असल्याने आता या सर्वांचीच खाती धोक्यात आली आहेत. सध्या सर्व सरकारी योजनांच्या अॅप, साईटच्या नावे बनावट खात्यांचा सुळसुळाट झाला असून अचूक खाते निवडणे ग्राहकांसाठी जिकिरीचे बनले आहे.
भीम अॅप नावाने प्ले स्टोअरवर सर्च केले असता एकावेळी एकाच नावाचे अनेक अॅप समोर येतात. यातील योग्य आणि सुरक्षित लिंक ओळखून या अॅपच्या माध्यमातून व्यवहार करणे गरजेचे बनले आहे. एकीकडे देशात कोरोनाच्या साथीने थैमान घातले असतानाच दुसरीकडे बेरोजगार युवकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
कमी श्रमात झटपट पैसे कमावण्याचे अनेक फंडे शोधून नागरिकांच्या पैशावर डल्ला मारण्याचे उद्योग सुरू आहेत. गुगल पे वर आपले पेमेंट करा, असे अनेक ऑनलाईन व्यवहारात सर्रास सांगितले जाते. अशावेळी त्याच्या सुरक्षेबाबत आधी शहानिशा करा आणि मगच पेमेंट करा असे सांगूनही ग्राहक हमखास फसले जातात. भारतात होणा-या सायबर गुन्ह्यांत जवळपास 70 टक्के गुन्हे हे मोबाईलच्या माध्यमातून होतात.
बनावट सीम कार्ड वापरुन हे गुन्हे केले जातात. अशा प्रकरणांतील तपास ही पोलिसांची डोकदुखी असते. अशाप्रकारे ऑनलाईन व्यवहारातून नागरिकांची फसवणूक होवू नये यासाठी अनेक मार्गाने नागरिकांचे प्रबोधन, मार्गदर्शन केले जाते. बँकाही वेळोवेळी मेसेजद्वारे ग्राहकांना अलर्ट करीत असतात. असे असूनही अनेक सुशिक्षित व्यक्ती अशा गुन्ह्यांमध्ये सहजपणे फसल्या जातात. नागरिकांनी इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर सावधपणाने करावा. कोणतीही लिंक शेअर करताना, ती उघडताना त्याची सत्यता, सुरक्षितता तपासा.
सध्याच्या काळात, सरकारने ऑनलाईन मद्य खरेदीला व डिलिव्हरीला सशर्त परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, जर तुम्हाला मद्य खरेदी करायचे असल्यास सदर अॅप किंवा वेबसाईट वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची खात्री करा व मगच वापरा, तसेच कुठल्याही अॅपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर, डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर सेव करू नका.
शक्यतो लरीह ेप वशश्रर्ळींशीू चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा. जर अशा वेबसाईट किंवा अॅपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व ुुु.लूलशीलीळाश.र्सेीं.ळप या वेबसाईटवर पण नोंदवा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.
ऑनलाइन प्रवेशाच्या माध्यमातून आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेने केली प्रवेश पंधरवाडयास सुरुवात
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});