संत तुकाराम महाराज यांचे प्रस्थान सोहळा मर्यादित वारकर्‍यांच्या उपस्थित संपन्न

2 119

आळंदी/देहू – संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळा निमंत्रित मानकरी/वारकरी यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. संत महाराज यांच्या पादुका मंदिरातच वास्तव्यास असतील दशमीला शासन सांगतिल त्या पर्यायाने पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे.

आज सकाळी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळा निमित्ताने शीळा मंदिरात संस्थान कमिटीचे अध्यक्ष मधुकर महाराज देहूकर, सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे आणि विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते विधीवत पूजा पार पाडून, संत तुकाराम महाराज मंदिरात विश्वस्त विशाल महाराज देहूकर, संतोष महाराज देहूकर, संजय महाराज देहूकर यांच्या हस्ते विधीवत महापूजा करण्यात आली, काल्याचे किर्तन सेवा झाल्यानंतर संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पुजा संस्थांनचे अध्यक्ष मधुकर महाराज देहूकर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसिलदार गीता गायकवाड, संत तुकाराम महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त आणि निमंत्रित पासधारक वारकरी उपस्थित होते.

सर्व मानपान पार पाडून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका फुलांनी सजावट करण्यात आलेल्या पालखीमध्ये ठेवून मंदिरात प्रदिक्षणा होऊन मंदिरातील भजनी मंडपात विसावली, सदर प्रस्थान सोहळ्यास मंदिर आणि परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



error: Content is protected !!