खळवट लिमगांव येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विवाह संपन्न

0 504

मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत विनोद – शिवकन्याचा विवाह सपन्न
वडवणी, प्रतिनिधी – कोरोनाच्या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोशल डिस्टंसिंग पाळत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत खळवट लिमगांव येथील रहिवासी महादेव आंबुरे यांचे चिरंजीव पाडुंरग काळे रा.ढेपेगाव तालुका माजलगांव यांची कन्या यांचा विवाह सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.

कोरोना या विषाणूने जगभरासह देशात राज्यात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसचा संसर्ग वाद नये म्हणून आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, ग्रामस्तरापासुन राज्यशासन केंद्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करत खळवट लिमगांव येथील महादेव आंबुरे यांचे चिरंजीव व शिवकन्या पाडुंरग काळे यांची कन्या यांचा विवाह सोहळा गुरुवार दि.११ रोजी आयोजित करण्यात आला होता. दोन्हीही परीवारामध्ये लग्नाची तयारी सुरु होती. मात्र कोरोना विषाणूच्या प्रकोपाने देशभरात लॉकडाऊन झाले. अशा परीस्थितीत सर्व कार्यक्रम रद्द ठेवण्यात आले.

प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत वधू वरच्या आई – वडिलांसह केवळ मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह पार पाडला. सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यात आले. कोरोना विषाणुमुळे अर्थव्यवस्था कोलमडुन गेली आहे. अशा प्रसंगी विवाहावर खर्च करणे योग्य नाही. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करण्याचा घरात विचार केला. याला घरातील सर्वांनी दुजोरा दिला. तसेच मुलाच्या व मुलीचा नातेवाईकांनी तयारी दर्शवली. विवाह संपन्न झाल्याचे कळल्यानंतर आप्त स्वकियांनी व्हिडीओ कॉलद्वारे वर – वधूला आशीर्वाद दिलेत.



error: Content is protected !!