आ.रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी गणेश कदम यांची निवड
पूर्णा – आ.रत्नाकर गुट्टे मित्र मंडळ पूर्णा तालुका अध्यक्ष पदी गणेश नारायणराव कदम यांची एकमताने निवड करण्यात आली.
आ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संपर्कप्रमुख माधवराव गायकवाड, सुरेशदादा बंडगर, हनुमंत लटपटे, कृष्णाजी सोळंके, सदिप पाटील, व्यंकटेश पवार, गजानन शिंदे, मारुती मोहिते, नवनाथ भुसारे, गजानन माने, सुभाष चापके, कैलास हुलसुरे, लक्ष्मण मस्के, शरद जोगदंड आदिने त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.