श्री.शरद पवार विचार मंचच्या बीड जिल्हाध्यक्षपदी श्रीनिवास देशमुख यांची निवड
परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)- गेल्या 25 वर्षांपासून सबंध महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मा.श्री.शरद पवार विचार मंचच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी परळी वैजनाथ येथील युवक नेते श्रीनिवास बालासाहेब देशमुख यांची निवड झाली आहे.
संघटनेचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष मा.अमित अंकुशराव ढमाळ यांनी ही निवड केली असून या निवडीचे पत्रही श्री देशमुख यांना दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या पंचवीस वर्षापासून म्हणजे 1996 पासून महाराष्ट्राभर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री मा शरद पवार विचार मंच या संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम तथा कार्यक्रम राबविले जातात.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या विचारांचा वारसा चालवणारी व आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने राज्यभर सामाजिक कार्य करणारी व तळागळातील सर्वसामान्यांना स्वावलंबी करून त्यांना हात बळकट करणारी ही संघटना आहे.
या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष श्री श्रीनिवास देशमुख यांच्यावरती बीड जिल्ह्यातील कार्यकर्ते व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री अमित ढमाळ यांनी आपल्यावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्षपदी केलेली निवड सार्थ ठरवून दाखवू, तसेच संघटनेचे कार्य तथा विचार समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू तसेच बीड जिल्ह्यात संघटन वाढण्यासाठी प्रयत्न करू असा मनोदय ही नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष निवडीनंतर श्री श्रीनिवास देशमुख यांनी व्यक्त केला.
दै.शब्दराजच्या वृत्तानंतर अखेर गरीबांच्या ताटात पडली दाळ
वडवणी येथील वकील बांधवांना किराणा किटचे वाटप
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});