नाभिक समाजाची महाराष्ट्र शासनाला निवेदनाद्वारे मदतीची विनंती
वैजापूर प्रतिनिधी – कोरोना व्हायरस विषाणूंच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनता कर्फ्यू जारी करण्यात आल्यापासून जवळपास अडीच ते तीन महिने उलटूनही जेन्टस पार्लर ( सलुन व्यवसाय ) तसेच ब्युटी पार्लर बंद करण्यात आले आहे.
त्यामुळे नाभिक समाजातील हातावर पोट भरणाऱ्या सलुन व्यवसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन सलुन व्यवसायिकधारकांना शासनाने सर्वतोपरी मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व तहसिलदार यांना करण्यात आली आहे.
नाभिक समाजातील लोकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोना व्हायरस विषाणूंच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळपास अडीच ते तीन महिने उलटूनही जेन्टस पार्लर व लेडीज ब्युटी पार्लर बंद करण्यात आले आहे या दरम्यान नाभिक समाजातील हातावर पोट नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
यातील 70 ते 80 टक्के सलुन व्यवसायिक भाडेतत्वावर दुकाने घेतली आहे त्याचे लाईट बिल दुकान भाडे कुठुन भरावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यातच त्यांनी घेतलेल्या कर्जाची हप्ते कसे भरायचे याने व्यथित झाले आहे.
त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे दरम्यान त्यांनी घेतलेली उसनवारी वाढतच आहे परिणामी नाभिक समाजातील अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष नैराश्य अवस्थेत झोकले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. आजही नाभिक समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे.
त्यांना व्यवसाय आधुनिकीकरण करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे तसेच नाभिक समाजातील नागरिकांची मागास प्रवर्गात समावेश करण्यात यावा यासाठी नाभिक संघटना प्रयत्नशील आहे. परंतु राज्यकर्ते व शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.
तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष घालून नाभिक समाजातील हातावर पोट नागरिकांची अडचण लक्षात घेऊन नाभिक समाजाला न्याय मिळवून द्यावा. या निवेदनावर नाभिक महामंडळाचे दिलिप अनर्थे सुधाकर आहेर अशोक पवार संजय वाघ दिलिप विश्वासु आदींसह अनेक नाभिक समाजातील नागरिकांच्या सह्या केल्या आहेत.
पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने सुनील गायकवाड यांना “कोरोना यौध्दा “मानपत्र दिले
वडवणी येथील वकील बांधवांना किराणा किटचे वाटप
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});