वृंदावण कॉलणीत नळजोडणी कॅम्पला प्रतिसाद

1 134

दोनशे अर्ज दाखल * 50 जणांना वर्क ऑर्डर

परभणी,प्रतिनिधी:- परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत आयुक्त देविदास पवार यांनी शहरातील तीनही प्रभाग समिती अंतर्गत नविन नळ कनेक्शन घेण्यासाठी कॅम्पचे आयोजन केले असून त्या प्रमाणे कॅम्प घेऊन नळ कनेक्शन दिल्या जात आहेत. आज (दि.13) प्रभाग क्रमांक चार मधील वृंदावन कॉलणी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात नविन कनेक्शन घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये आयुक्त देविदास पवार, नगरसेवक प्रशांस ठाकुर यांच्या उपस्थितीत नागरीकांच्या कागदपत्रांची पुतर्ता करण्यात येऊन तसेच त्यास तांत्रिक मान्यता देऊन नळ कनेक्शन देण्यात आले. सहाय्यक आयुक्त सुधाकर किंगरे, अभियंता
बालाजी सोनुले व राहुल धुतडे, बील कलेक्टर विठ्ठल गिराम, श्री. सवणे, आवेज हाश्मी, शेख रफीक, श्री. रनेर आदीची उपस्थितीत आयुक्त श्री. पवार यांनीनागरीकांना आपल्या परिसरात येलदरी येथून शहरात पाईपलाईन आणण्यात आली आहे. त्यावर नागरीकांनी कनेक्शन घ्यावेत म्हणून हा कॅम्प घेण्यात आला आहे. नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून याच ठिकाणी फॉर्म भरून घेतले जात आहे. ज्यांच्या त्यावर स्वाक्षर्‍या लागतात, त्यांना देखील येथेच बोलावण्यात आले आहे.

 

तेथेच तात्काळ कार्यारंभ आदेश दिले जात आहेत. या परिसरातील सन्माननिय सदस्यांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरीकांनी या कॅम्पमध्ये कनेक्शन घेऊन होणारी गैरसोय टाळावी.

 

कोविद 19 चा प्रभाव वाढू नये म्हणून नागरीकांनी काळजी घ्यावी विनाकारण बाहेर फिरू नये, मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे, परिसर स्वच्छ ठेवावा. महापालिका कमर्चारी आपल्या परिसरात येतात, घंटागाडी येते. कचरा विलगीकरण करून टाकावा. नागरीकांनी मालमत्ता कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्री. पवार यांनी केले. यावेळी 50 नळधारकांना आयुक्त श्री. पवार यांच्या हस्ते वर्क ऑर्डर देण्यात आल्या. तर दोनशेवर नागरीकांनी नळ कनेक्शनसाठी अर्ज दाखल केले. यावेळी नगरसेवक प्रशास ठाकुर यांनी वृंदावन कॉलणीतील नागरीकांनी नविन कनेक्शनसाठी उपस्थित राहिल्याबद्दल आभर व्यक्त केले. या परिसरातील नागरीकांचे अर्ज भरुन घेतले जात आहेत, उवर्रीत नागरीकांनी देखील या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. ठाकुर यांनी केले.

 

प्रास्ताविक जाधव सर यांनी केले. यावेळी राजु कदम, किरण भोगावकर, डॉ. कुरे, पाते, कनकदंडे,साळापुरीकर, बोराडे, आदी स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

“काळी आई सांभाळ करी..” कोरोना विसरून शेतकरी राजा थेट शेतशिवारात!

 

error: Content is protected !!