मराठी कामगार सेनेचा वाहतूकदारांना इशारा
सातारा, प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व पुण्यातील चाकरमाणी लोक आपापल्या गावाकडे मोठ्या प्रमाणात आले आहेत. मुंबई व पुणे येथील व्यवसाय बंद असल्यामुळे व सरकारने केलेल्या लॉकडाऊन काळात चाकरमाणी लोकांनी घराचा रस्ता धरला परंतु काही महिन्यानंतर सरकारने पुकारलेल्या लॉकडाऊन मध्ये शिथिलता जाहीर केल्यानंतर परत मुंबई व पुणे येथील व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत मुंबई व पुण्याकडे जाणारे चाकरमाणी लोक मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्ह्यातील आहेत.
लॉकडाऊन झाल्यापासून काम बंद असल्याने घरातच असणाऱ्या नोकर वर्गाला आर्थिक चणचण जाणवत होती त्यामुळे हा नोकर वर्ग हताश झाला होता. परंतू भारत सरकार व राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आणि हा नोकर वर्ग आपआपल्या कामावर रूजू होण्या साठी मुंबई पुण्यासह राज्यातील विविध शहरांत जाण्यास निघाला मात्र गावावरून मुंबई व पुणे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून काही खाजगी वाहने हि चारपट भाडे वसूल करत असून काही प्रवाशांना तर आरेरावीची भाषा सुध्दा करताना निदर्शनास येत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पैशाची व रोजगाराची मोठ्या प्रमाणात चिंता वाटत आहे. अश्यातच समाजातली काही संधी साधू घटक यांचा फायदा घेऊन त्यांचे रिकामे खिसे भरण्यात धन्यता मानत आहेत. जर कोण गोरगरीब चाकरमाण्याना लुटण्याचा प्रयत्न करत असतील तर मराठी कामगार सेना या वर ठोस भूमिका घेईल हे लक्षात ठेवावे तसेच कोणत्याही चाकरमाणी लोकांना चार पट भाडे आकारून जर जनतेची लुट खाजगी वाहतूकदार करीत असतील तर त्यांचा गाडी नंबर मिळताच महाराष्ट्रात कुठेही वाहने फिरू देणार नाही हे संबंधित संधी साधू वाहनधारक व्यक्तीने लक्षात घ्यावे असा इशारा मराठी कामगार सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ पुजारी यांनी नियमबाह्य खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहतूक धारकांना परखड शब्दात दिला आहे. मराठी कामगार सेना जनतेची लुट करणाऱ्यांना सोडणार नाही वेळ पडली तर कायदाही हातात घेऊ असेही ते म्हणाले.