पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र ह्यांच्यातर्फे स्वप्निल अरुण बागुल ह्यांना “कोरोना योद्धा सन्मानपत्र” पुरस्कार

0 214

अंबरनाथ, प्रतिनिधी – देशभरात जगाच्या पाठीवर कोरोनासारख्या ह्या महामारी ने धुमाकूळ घातला असून त्याचे पडसाद महाराष्ट्रासह अंबरनाथ शहरात उमटले असून दिवसेंदिवस अशा कठीण प्रसंगसमयी मनसे माजी नगरसेवक तथा गोरगरीबांचे दानशुर स्वप्निल अरुण बागुल ह्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन तसेच जनतेसाठी वारंवार सूचना आदेश निर्देश जनतेपर्यंत पोहचवून जनतेला वारंवार साबणाने हात धुणे, सानिटायझरचा वापर करणे, तोंडाला मास्क अथवा रुमाल वापरणे सुरक्षित अंतर ठेवणे व सर्वसामान्य माणसाला कोरोनाची लागण होऊ नये म्हूणन स्वप्निल बागुल यांनी आपल्या स्वतःच्या जिवाची पर्वा न करता संचार बंदी काळात बहुमूल्य वेळ देऊन सामाजिक कार्य केले.

तसेच गोरगरीबांना आर्थिक व जीवनावश्यक वस्तुच्या रुपात मदत केली. या सर्व कामाची दखल घेत पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र ह्यांच्यावतीने माजी नगरसेवक स्वप्निल अरुण बागुल यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र म्हूणन पुरस्कार देण्यात आला आहे.

याबाबत पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे, उपाध्यक्ष राकेश खराड़े, सचिव डॉ. वैभव पाटिल, सहसचिव अमोल सांगळे, खजिनदार शैलेश ठाकुर या सर्वांनी माजी नगरसेवक स्वप्निल अरुण बागुल ह्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

नांदगाव शहर कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा

 

error: Content is protected !!