SBI बँकेच्या ग्राहकांची अवस्था – भीक नको पण कुत्रं आवर अशी

1 124

सातारा, प्रतिनिधी – सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली भारतीय स्टेट बॅंकेच्या ग्राहकांची अवस्था ही भीक नको पण कुत्रं आवर अशी झाली आहे. SBI बँकेच्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्या लोकांशी उद्धट वर्तनाच्या अनेक तक्रारी नॅशनल सोशालिस्ट पार्टीकडे आल्या आहेत. शेतकरी असो,वयोवृद्ध नागरिक असो , किंवा सुशिक्षित लोक असो एवढेच नाहीतर देशाचे रक्षण करणारे सैनिक असो आणि आपले पोलीस असो यापैकी कोणालाही हे स्टेट बँकेचे कर्मचारी सोडत नाहीत.हे कर्मचारी सतत उर्मटपने ग्राहकांशी बोलतात.वयस्कर लोकांना मुद्दाम त्रास देतात, कधीही नीट उत्तरे देत नाहीत सतत टोलवा टोलवीचे उत्तरे देतात.बँकेचे कर्मचारी बँक ही वैयक्तिक स्वतःची जहागिरदारी असल्यासारखी वागतात.सरकार एवढे जीव तोडून लोकांची सेवा करत असताना हे SBI बँकेचे कर्मचारी लोकांशी एवढया निष्ठुरपणे वागतात.यामुळेच लोकांचा खाजगी बँकांकडे ओढा वाढलेला आहे.

कोणतेही कर्ज असो पीक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज, या बँकेच्या कर्मचाऱ्यांना काही देने घेणे नसते.पेन्शन साठी येणाऱ्या वयस्कर लोकांना तर हे कर्मचारी या टेबलवरून त्या टेबलवर हाकलून देत असतात.यापुढे जर लोकांना बँकेच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने जर सर्वसामान्य लोकांना त्रास दिला तर यापुढे खूप मोठे जनआंदोलन करण्यात येईल.याबाबत मा.मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे साहेब यांनी लक्ष देऊन सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याऱ्या स्टेट बँक कर्मचारी यांना लोकांशी चांगल्या वर्तुणुकीची समज दयावी अन्यथा नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल,असा इशारा माहिती अधिकार आणि पत्रकार समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.दिपक कांबळे यांनी दिला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019: पात्र लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

“मिशन बिगीन अगेन” मध्ये महाराष्ट्राने घेतली झेप

एमआयडीसीचा राज्यातील उद्योगांना दिलासा विविध शुल्क आकारणीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ



error: Content is protected !!