सेलिब्रिटींचे प्रश्न आणि आमची उत्तरे “आपल्या हक्काच्या सिक्रेट्स ऑफ अध्यात्म या यूट्यूब चैनलवर प्रसारीत..!
सिक्रेट्स ऑफ अध्यात्म हे यूट्यूब चैनल चालू करण्याचा उद्देश प्रसिद्धी एवढाच सीमित नव्हता. कारण प्रसिद्ध होण्यापेक्षा सिद्ध होणे हे केव्हाही श्रेष्ठ असते, याची जाणीव मला अध्यात्माने केव्हाच करविली होती .आज अथक प्रयत्नाने मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर सिद्ध होत आहे.
वेद, उपनिषदे, पुराणे वेगवेगळ्या ऋषी सविता यांचा अभ्यास करून या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात कशा पद्धतीने अवलंबू आणि आजच्या वैज्ञानिक युगात अध्यात्माचा वापर करून आपले जीवन कसे परिपूर्ण करू याचा विचार करून सौ.काजल किरण कुडाळकर उर्फ (ताई कुडाळकर) या आपल्या समोर प्रक्षेपित होणार आहेत.
आम्ही अत्यंत वेगळा असा अध्यात्मिक कार्यक्रम घेऊन आपल्यासमोर येत आहोत. कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे कि, सेलिब्रिटींचे प्रश्न आणि आमची उत्तरं… या कार्यक्रमात सेलिब्रिटी त्यांच्या मनातील रूढी, परंपरा ,सण, समारंभ, श्रद्धा, अंधश्रद्धा, अध्यात्म याबाबतीत प्रश्न विचारणार आहेत आणि सौ काजल किरण कुडाळकर या सगळ्यावर शास्त्रीय दृष्ट्या विचार करून उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
हा कार्यक्रम जितका मनोरंजनात्मक होईल त्याहून जास्त तो बोधात्मक असेल आणि त्यामुळे आपल्याला एक वेगळी दृष्टी मिळेल यासाठी सौ. कुडाळकर (ताई कुडाळकर) प्रयत्नशील असतील यांत वाद नाही. त्यांच्या समस्त टीमचा या चॅनल मागे सिंहाचा वाटा आहे.
त्याचप्रमाणे पती निर्माते किरण कुडाळकर, डायरेक्टर आर्यवीर विश्वनाथ , एडिटर आणि असिस्टंट डायरेक्टर विशाल साळवे, एडिटर अमन कोहरी, मुलगा कॅमेरामन, फोटोग्राफर आणि डिझायनर सिद्धेश कुडाळकर, निवेदक श्रद्धा मोहिते ,मृणाली जांभळे , समर्थ म्हात्रे आणि इतर अनेकजण.. तसेच माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळी या माझ्या प्रवाहात सोबत आहेतच.
||एकमेकास सहकार्य करू अवघे धरू सुपंथ।। याची आज खऱ्या अर्थाने प्रचिती जाणवली. तेव्हा पुन्हा एकदा समस्त प्रेक्षक वर्गाला अभिवादन करून आपल्यासमोर लवकरच येत आहे. ” सेलिब्रिटींचे प्रश्न आणि आमची उत्तरे “आपल्या हक्काच्या सिक्रेट्स ऑफ अध्यात्म या यूट्यूब चैनल वर …..
महेश्वर भिकाजी तेटांबे
नाथनगरचा निम्मा ऊस डुक्करांनी केला फस्त, शेतकरी त्रस्त
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});