बाजार समितीच्या पंचनाम्यात ११६१ पैकी 3८५ शेतकऱ्यांच्या घरी आढळला कापूस , व्यापाऱ्यांचे पितळ उघडे पडणार

0 117
  • ५२३शेतकऱ्यांकडे कापूस नाही ,पथकाकडून होणार झाडाझडती

माजलगांव,प्रतिनिधी :- लॉकडऊनमुळे शेतकऱ्यांचा कापूस घरातच होता . शासनाने नोंदणी केलेला कापूस खरेदीचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे . नोंदणी केलेला कापूस शेतकऱ्यांचाच आहे की व्यापाऱ्यांचा याची खातरजमा करण्यासाठी माजलगांव बाजार समितीने शेतकऱ्याची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पंचनामे केले .

तेव्हा नोंदणी केलेल्या १ ९ ६१ पैकी केवळ ३८५ शेतकऱ्यांच्या घरी कापूस आढळून आला . कापूस नसलेले ५२३ शेतकरी , पर जिल्ह्यातील १३२ शेतकरी तर बाहेर तालुक्यातील १४० शेतकरी आढळले आहेत . आता महसूलची ५९ पथके तालुक्यात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन क्रॉस चेकिंग करणार असल्याने बोगस नोंदणी करणाऱ्या दलाल व व्यापाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे .

सीसीआयच्या वतीने माजलगांव तालुक्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची यंदा बाजार समितीकडून नोंदणी केली जात आहे . तालुक्यात साडेचार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली . पण लॉकडाऊनमुळे अडीच हजार शेतकऱ्यांचीच मापे झाली . उर्वरित १९६१ शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले होते . शेवटी पणन महासंघाने पूर्ण कापूस खरेदीचे आदेश दिले . तालुक्यात बाजार समितीने नोंदणी केलेले शेतकरी व काही शेतकऱ्याच्या नोंदी राहिल्या होत्या .

जिल्हाधिकारी व पणन संघाने उर्वरित शेतकऱ्यांचा नोंद घेण्याचे बाजार समितीला सांगितल्याने ९०५ शेतकऱ्यांच्या नवीन नोंदी झाल्या . त्यामुळे २०६६ शेतकरी नोंदणीकृत झाले . परंतु बाजार समितीला यात काही काही नोंदी व्यापाऱ्याकडून व दलालाकडून करण्यात आल्याचा संशय आला होता . त्यामुळे बाजार समितीने मागील आठवड्यात बाजार समितीच्या सहा पथकांनी शेतकऱ्याच्या घरी जाऊन कापूस आहे की नाही याची झाडाझडती घेतली .

त्यामुळे ११६१ पैकी केवळ निम्म्यापेक्षाही कमी म्हणजे ३८५ शेतकऱ्यांकडे कापूस असल्याचे उघड झाले . कापूस नसलेले ५२३ , बाहेर जिल्ह्यातील १३२ , बाहेर तालुक्यातील १४० आणि संपर्क न झालेले २२ शेतकरी आढळल्याची माहिती माहिती सभापती अशोक डक , सचिव हरिभाऊ सवणे यांनी दिली .

महसूलकडून प्रत्येक गावात पंचनामे सुरू
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महसूल प्रशासनाने बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी नोंदीची यादी घेतली . या यादीनुसार आता प्रत्येक गावात नोंदीनुसार तलाठी ग्रामसेवक व गटसचिव अशा तिघांचे पथक तयार करण्यात आले आहे . हे पथक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापसाचा पंचनामा करण्यात येत आहे . त्यासाठी ५९ पथके तयार करण्यात आले आहे .

नेमकी आकडेवारी कळेल
माजलगांव तालुक्यातील शेतकऱ्यांकडे नेमका किती कापूस शिल्लक आहे , याचा अंदाज येत नाही . नोंदणीकृत शेतकरी किती शिल्लक राहिलेत . यासाठी घरी जाऊन महसूलचे पथक खात्री करून पंचनामा करणार आहे . शासनाला नेमकी आकडेवारी कळणार आहे . -प्रतिभा गोरे , तहसीलदार , माजलगांव

पोलीस नाईक स्वाती वाघमारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

 

error: Content is protected !!