झरी येथील 3 रुग्ण बाधीत ; संपर्कातील अकरा जण रुग्णालयात

3 215

परभणी,प्रतिनिधी:- कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाप्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असताना. याचा फैलाव वाढतच चालला आहे.यात प्रामुख्याने जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्ती वाहक म्हणून कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.
20जून रोजी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एक व्यक्ती झरी येथे दोन दिवस वास्तव्यास राहून परतला.तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. झरी येथील त्याचे 2 मामा व 1मामी यांचे नमुने घेण्यात आले.27 जून रोजी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.त्यांनतर त्यांच्या संपर्कात आलेल्या झरीतील 11 व्यक्तीला कोरोन्टाईन करण्यात आले.
जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णसंख्या  112 तर बरे झालेले 90, मयत 4 तसेच 18 रुग्ण उपचार घेत आहेत.

error: Content is protected !!