धक्कादायक… मेथी समजून करून खाल्ली गांजाची भाजी आणि मग…
शब्दराज, वेब टीम – उत्तर प्रदेशातील एकाच कुटूंबातील सहा जणांनी चक्क मेथी समजून गांजाची भाजी खाल्याने त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील मियागंज या गावात एक विचित्र घटना घडली आहे. जे ऐकून तुम्हाला धक्का बसण्याऐवजी डोक्यावर हात माराल. झालं असे की, उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील एकाच कुटूंबातील 6 जणांनी मेथीची भाजी समजून गांजाची भाजी करुन खाल्ली.
मिळालेल्या माहितीनुसार गावातील एका तरुणानं मजेमध्ये मेथीची भाजी आहे असं सांगून गांजा दिला होता. कन्नौज सदर कोतवाली भागातील मियागंज गावात नवल किशोर नावाच्या व्यक्तीने या कुटूंबातील ओमप्रकाश यांचा मुलगा नितेशला कोरडी मेथीची भाजी असल्याचं सांगून एक पिशवी दिली. त्यानंही कोरडी मेथीची भाजी आहे असं समजून भाजी बनवली आणि खाल्ली. ोड्या वेळाने सगळ्या कुटुंबाला त्रास व्हायला लागला. त्यांनी शेजारच्या लोकांना डॉक्टरांना बोलवायला सांगितले. शेजारच्यांनी तात्काळ डॉक्टरांना बोलवून घेतले. त्या कुटुंबाला दवाखान्यात हलवण्यात आले. शेजारच्यांनी सोबतच पोलिसांना सुद्धा बोलवून घेतले. पोलिसांनी घरात तपासणी केल्यावर त्यांना कढईत गांजाची भाजी दिसली त्याचबरोबर पॉकेटमध्ये उरलेला गांजा दिसला. पोलिसांनी तात्काळ त्या भाजी विक्रेत्याला अटक केली.
पोलिसांनी भाजीचे सॅपल्स ताब्यात घेतले आहेत. भाजी म्हणून गांजा विकणार्या नवल किशोर नावाच्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अधिक तपास करत आहेत.
read this – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?
read more – सावधान… मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा, नागरिकांसाठी सरकारचे अलर्ट