कृषी पदवीधर युवाशक्तीच्या माध्यमातून राज्यात कृषिदिन साजरा

0 96

कापूरहोळ,  विठ्ठल पवार – १ जुलै महाराष्ट्र कृषी दिन निमित्त कृषी क्षेत्रातील अवगत असलेल्या ” कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या ” माध्यमातून राज्यातील प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यामध्ये संघटनेच्या सदस्य यांच्या आणि शेतकऱ्यांच्या मदतीने कृषिदिन साजरा केला गेला. आपल्या अन्नदात्या शेतकऱ्या प्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने कृषी युवाशक्ती चे संस्थापक अध्यक्ष जयदीप दादा ननावरे यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली आणि संघटनेच्या सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम उत्साहाने पार पाडला.

भोर तालुक्यामधील संगमनेर या गावामध्येही भोर तालुका कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. शेतकऱ्यांना लिंबू व शेवग्याची रोपे, भात कापणीचे विळे, आर्सेनिक अल्बम ३० हे औषध ई चे वाटप संघटनेकडून करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडासा हातभार लावून त्यांचे जीवन आनंदी करण्याच्या हेतूने ही रोपे आणि आवजरे वाटली असून शेतकऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी औषध वाटप केले आहे तसेच इथून पुढेही शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी कृषी युवाशक्ती संघटना सदैव कार्यशील राहील अशी माहिती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कंक यांनी दिली. यावेळी SRT या आधुनिक भात शेती पद्धती बद्दल योगेश बनसोडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आदर्श शेतकरी अनिल बांदल यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संगमनेर च्या सरपंच सौ. रेश्मा बांदल, संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चव्हाण, प्रदीप लिमण, युवराज कोंडे, अजय खोपडे, प्रगतशील शेतकरी किरण यादव, सुरेश कारभळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज कोंडे, प्रस्तावना कुणाल चव्हाण व आभार प्रदर्शन प्रदिप लिमण यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रशासनाने दिलेल्या सोशल डिस्टंसिंग च्या सर्व नियमांचे पालन करून पार पडला.

error: Content is protected !!