तीन वर्षांनंतरही मिळेनात फायदे ; विधवा स्त्रियांचे हेलपाटे निवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार

1 173

माजलगांव,प्रतिनिधी :- येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीचे मागील तिन वर्षात पाच कर्मचारी सेवानिवृत्त झाले असुन त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे फायदे मिळाले नसल्याने दोन कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नी आणि कर्मचाऱ्यांना खेटे मारण्याची वेळ आली आहे . या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे .

माजलगांव आडत मार्केटचे नाव मराठवाड्यात २-३ नंबरवर होते . तसेच माजलगांव बाजार समितीचे उत्पन्नही चांगले होते . परंतु मागील १०-१५ वर्षांत तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात थोडी फार कमतरता आली . तालुक्यात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने व कापसाच्या मार्केट फीसवर बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगार व इतर सर्व खर्च निघतो . तालुक्यात सोयाबीन , तूर , बाजरी , ज्वारी आदी धान्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर होते .

माजलगांव बाजार समितीला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न असताना देखील कर्मचाऱ्यांच्या वेळेवरपगार न करणे व कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांना मिळणारे सेवानिवृत्तीचे फायदे मिळण्यात अनेक अडचणी उभा करून त्यांना विनाकारण सतावण्याचे काम बाजार समितीकडून वारंवार होताना दिसते . तीन वर्षापूर्वी सेवानिवृत्त विष्णु शर्मा व इतर कर्मचाऱ्यांना देखील अनेक वर्षे सेवानिवलीचे फायदे मिळवण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतरच त्यांना सेवानिवृत्तीचे फायदे मिळाले .

येथील बाजार समितीत तीन वर्षांत पाच कर्मचारी सेवानिवृत्त झाले होते . या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आर.एस.वाघमारे , गणेश लोढा , डी.बी.फुके नारायण कुंभार व बालासाहेब चव्हाण यांचा समावेश आहे . यातील डी.बी.फके व नारायण कुंभार यांचे निधन झाले . सेवानिवृत्त झालेले तीन कर्मचारी व दोन विधवा महिला मागील तीन वर्षांपासून बाजार समितीकडे अनेक वेळा लेखी व तोंडी जीपीएफ , भविष्य निर्वाह निधी , अर्जित रजा व इतर सेवानिवृत्तीचे फायदे मिळण्यासाठी मागणी करूनही त्यांना अद्याप फायदे मिळ शकले नाहीत .

कृउबाच्या चुकीने निवृत्तांची उपासमार
बाजार समितीने अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसेच भरलेलेच नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊन ३-३ वर्षे झाली परंतु बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या चुकीमुळे सेवानिवृत्तांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे . या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जवळपास एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम अडकली असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले .

माजी सचिवांना मृत्यूनंतरही मिळेनात निवृत्तीचे फायदे
बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव स्वर्गीय डी.बी.फुके हे सचिव असताना त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे फायदे मिळवून दिले होते . परंतु ते सेवानिवृत्त होऊन आजारपणामुळे त्यांचे निधन झाले परंतु त्यांना सेवानिवृत्तीचे फायदे अद्याप मिळू शकले नाहीत .

“माजलगांव बाजार समितीचे विभाजन होऊन वडवणी बाजार समितीची निर्मिती झाली . यामुळे अनेक कर्मचारी या बाजार समितीकडे गेल्याने आम्ही भरलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम वडवणी बाजार समितीचा कोणी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास त्यांना ती रक्कम मिळते . जो पर्यंत ती बाजार समिती ती रक्कम भरत नाही तोपर्यंत आमच्या कर्मचा – यांना मिळत नसल्यामुळे ही रक्कम थकली असून , आम्ही अनेकवेळा दोन्ही बाजार समितीचे व्यवहार वेगळे करण्यासाठी मागणी केली आहे .

– हरिभाऊ सवने , सचिव , कृषी उत्पन्न बाजार , समिती माजलगांव.

राष्ट्रवादीचे ८ अन् नगराध्यक्षपदी भाजपाचा थाट ! आ.सोळकेंचे वाटते भाजप प्रेम ज्येष्ठ नेत्यांच्या पचनी पडणार का ?

 

error: Content is protected !!