गंगाखेड शहरातील योगेश्वर कॉलनी, आंबेडकर नगर, ओम नगर, तिवट गल्ली व सेलूतील पारीख कॉलनी प्रतिबंधित क्षेत्र
परभणी, प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत असून आज दिनांक 11 जुलै रोजी दुपारपर्यंत मिळालेल्या अहवालानूसार गंगाखेड शहरात 9 व सेलू येथे एक कोरोना बाधित रूग्ण आढळून आला आहे.
गंगाखेड शहरातील एकाच वेळेस 9 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने शहराला मोठा धक्का बसला आहे. गंगाखेड शहरातील योगेश्वर कॉलनी, आंबेडकर नगर, ओम नगर, व तिवट गल्ली या भागात कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने हा भाग व लगतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
तसेच सेलू शहरातील पारीख कॉलनीत कोरोनाचा रूग्ण आढळल्याने पारीख कॉलनी व लगतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे.
परळी एसबीआयच्या संपर्कातील तब्बल 534 लोकांचे घेतले स्वॅब
part 4 : अघळ पघळ अन घाल गोंधळ !