सोळंके कारखान्याने थकविले पैसे, कारवाई करण्याची साखर आयुक्तांकडे मागणी

0 201

माजलगांव,प्रतिनिधी:- लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेऊनही शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे थकविले आहेत . यामुळे चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत , अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी साखर आयुक्तांकडे निवेदनात केली आहे .

निवेदनात म्हटले , की कारखान्याने गळीत हंगाम २०१ ९ २० मध्ये ४ लाख २८ हजार ७६० मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी ८.०८ साखर उताऱ्यासह ३ लाख ४७ हजार २० एवढ्या साखर पोत्यांचे उत्पादन घेतले .१५ जानेवारीपर्यंत ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यांना अडीच हजार रुपये प्रति मेट्रिक टनप्रमाणे दिले असून , १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत गाळप केलेल्या उसाचे बिल दीड हजार रुपयांप्रमाणे अदा केले आहे . त्यापुढील शेतकऱ्यांना अद्याप छदामही देण्यात आलेला नाही .

शासन निर्णयानुसार १४ दिवसांच्या आत एफआरपीनुसार बिलाची रक्कम अदा करणे बंधनकारक आहे ; परंतुकारखान्याने पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या बिलाची रक्कम अदा केलेली नाही . वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या ऊसबिलाचे पैसे देण्यासाठी कारखान्याने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून ३८ कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे ; परंतु उचललेल्या कर्जाची रक्कम कारखाना प्रशासनाने कर्ज खात्यात जमा केली आहे . या प्रकरणाची चौकशी करावी , अशी मागणी त्यांनी निवेदनात केली .

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी कमी झाल्याने साखरविक्री होत नसल्याने पैसे उपलब्ध होत नाहीत . लवकरात लवकर साखरेवर कर्ज घेऊन शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे . एम . डी . घोरपडे , कार्यकारी संचालक , सोळंके कारखाना.

सुरगाण्यात आमदार.नितिन पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून मुक्या जनावरांची मुक्तता…….

 

error: Content is protected !!