महावितरणकडून २०मीटर जप्त : छेडछाड केलेले मीटर तपासणीसाठी पाठवणार दिंद्रुडमध्ये वीजचोरांना चाप
माजलगांव ,प्रतिनिधी:- तालुक्यातील दिंद्रूड येथे सैलानीबाबा परिसरात वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणने सोमवारी कारवाई केली . तसेच वीजमीटरही जप्त केले आहेत . या कारवाईने वीजचोरांची पुरती धांदल उडाली होती .
दिंद्रुड येथील सैलानीबाबा परिसरात विजेच्या लपंडावाला परिसरातील नागरिकांसह महावितरणचे कर्मचारी पुरते वैतागले होते . गेल्या सहा दिवसांत हा परिसर अंधारात होता . तेलगाव उपकार्यकारी अभियंता पेन्सलवार यांनी सोमवारी दिंद्रुड ३३ केव्ही उपकेंद्राला भेट देत रोहित्राची तपासणी केली .
यावेळी अतिरिक्त भार सहन न होत असल्याने रोहित्र जळत असल्याचे लक्षात घेऊन सैलानीबाबा परिसरातील मिटर तपासणी केली . जवळपास २० मीटमध्ये छेडछाड केल्याने ते सुरुच नव्हते . संशयास्पद सर्व २० विद्युत मीटर जप्त केले असून , तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता पेन्सलवार यांनी सांगितले .
दिंद्रुड येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी छापे मारत जप्त केलेले मीटर हे गावातील प्रतिष्ठित लोकांचे असल्याचे समजते . यामुळे प्रामाणिकपणे वीजबिल भरणा करुनही काही जणांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे . यामुळे महावितरणने कडक पाऊले उचलत या ‘ प्रतिष्ठितां वर कारवाई करावी , अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .
फौजदारी कारवाई होण्याची शक्यता
दरम्यान मीटर जप्त केलेल्या सर्व ग्राहकांवर फौजदारी तथा दंडात्मक कारवाई होणार असल्याचे काही जाणकारांनी सांगितले आहे . सैलानीबाबा परिसरातील मिटर छेडछाड करणाऱ्यांमध्ये सोमवारी कमालीची धांदल उडालेली दिसून आली.
दुसऱ्या खतांची खरेदी केली तरच युरिया भेटन.!’श्री,चा अट्टाहास.?
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});