पर्यटनाला चालना देणारे ‘अखिल भारतीय पर्यटक वाहने अधिकृत मंजुरी आणि परवाना नियम-2020’
दिल्ली – देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम-1989’ अंतर्गत रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय परवाना प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी एक अधिसूचना जाहीर केली आहे.
राष्ट्रीय परवाना प्रणालीच्या अंतर्गत मालवाहू वाहनांच्या यशानंतर मंत्रालय पर्यटक प्रवासी वाहनांची अखंडित हालचाल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या उद्देशाने नवीन नियमांचा एक संच तयार करण्यात आला असून याला “अखिल भारतीय पर्यटक वाहन अधिकृत मंजुरी आणि परवाना नियम-2020” म्हणून ओळखले जाणार आहे.
या नवीन योजनेनुसार,कोणतेही पर्यटक वाहन चालक (ऑपरेटर) ऑनलाईन पद्धतीने “अखिल भारतीय पर्यटक अधिकृत मंजुरी/परवाना” साठी अर्ज करू शकतात.
अधिकृत मंजुरी/परवान्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर 30 दिवसांच्या आत नियमात नमूद केल्यानुसार सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर आणि यासाठी देशभरात लागू असलेले शुल्क जमा केल्यानंतर अधिकृत मंजुरी/परवाना दिला जाणार.
या योजनेमध्ये जसे प्रकरण असेल त्यानुसार अधिकृत मंजुरी/परवान्याच्या स्वरुपात लवचिकतेचा समावेश करण्यात आला आहे आणि हे तीन महिन्यासाठी किंवा एकावेळी बहुसंख्य, परंतु तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी वैध नसणार. देशातल्या काही भागातला पर्यटनाचा मर्यादित हंगाम आणि ज्यांची आर्थिक क्षमता मर्यादित आहे, अशा चालकांचा विचार करून ही तरतूद समाविष्ट केली आहे.
याच्या संदर्भात एक केंद्रीय माहिती संग्रह तयार केला जाणार, ज्यामुळे पर्यटकांची हालचाल सुलभ होणार आणि पर्यटनाला चालना मिळेल आणि अशा नोंदणीद्वारे मिळणारा महसूल वाढण्यास मदत देखील होणार आहे.सध्या अस्तित्वात असलेले सर्व परवाने त्यांच्या वैधते दरम्यान लागू होतील.
नियंत्रणात आणून दाखवलं; WHO कडूनही करोनासंदर्भातील धारावी मॉडेलचं कौतुक.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});