गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

1 164

मराठवाडा सारख्या ग्रामीण भागातून येऊन पुण्यात रोवले पाय
टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने उभे केले पोर्टल
माध्यमांवर संक्रांत येताना जपली नवी ओळख
माध्यमांत मध्ये येऊ पाहणाऱ्या पिढीच्या समोर उभा राहिला आयडॉल

पुणे ,प्रतिनिधी –  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव हा प्रसारमाध्यमांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरू लागला आहे. या परिस्थितीमध्ये आहेत ती प्रसारमाध्यमात अस्तित्वाची लढाई लढत आहेत. अशा या युद्धप्रसंगी गुगलने मराठी भाषेतल्या एका वेब पोर्टल ला गगन भरारी घेण्यासाठी मोठी आर्थिक मदत केली आहे.

ही किमया ज्या वेब पोर्टलच्या मालकांनी केली आहे, तो मराठवाड्यासारख्या अतिशय ग्रामीण भागातून आलेला आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात येऊन त्याने आपली कंपनी स्थापन केली, नुसती कंपनी स्थापन केली नाही तर ती नावारूपाला आणली आणि माध्यमांच्या स्पर्धेमध्ये तिने तिचे अस्तित्व निर्माण केले. हे करणारा दुसरा तिसरा कोणी नसून औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुलानी वाडगाव या गावचा मनोज जाधव हा तरुण आहे.

इनरिच कंपनीचे कृषीनामा

मनोज जाधव यांनी पुण्यामध्ये इनरिच नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या अंतर्गत कृषी विषयक अपडेट आणि बातम्या देण्यासाठी कृषीनामा नावाचे वेब पोर्टल सुरू केले. स्वतः ग्रामीण भागातून असल्याने आणि शेतीची आवड असल्याने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी या पोर्टल मध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या गरजेच्या गोष्टीचा समावेश केला. शेतकरी परिवारात असल्यामुळे शेतीतील कामे आणि आणि त्यातील प्रत्येक्ष अनुभव याची सांगड या पोर्टल मध्ये आहे.

अल्पावधीत मिळाली लोकप्रियता

माध्यमांच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये कृषी विषयक माहिती देणारी अनेक पोर्टल आहेत. तरीपण कृषीनामाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद पहात किरकोळ स्वरूपाचे बदलही वेब पोर्टलमध्ये केले.

बारा हजार कंपन्यांची स्पर्धा

एका बाजूला प्रसारमाध्यमांमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आर्थिक स्पर्धा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक छापील वर्तमानपत्र बंद पडली तर काही त्या मार्गाने जात आहेत. या बिकट आर्थिक कोंडीमध्ये गूगल किंवा फेसबुक सारख्या मोठ्या कंपन्या मदतीसाठी आहेत. तिथेही ही स्पर्धा आहे. जगभरातील बारा हजाराहून अधिक वेब पोर्टलनी गुगल कडे मदत मागितली होती.

गुगलने दिले पंखांना बळ

जगभरातील बारा हजार कंपन्यांमधून गुणवत्ता दर्जा आणि आणि नियमित अपडेट या आधारावर आणि आणखी काही निकषांवर जगभरातील पोर्टलस् ची चाचणी घेतली गेली. त्यातून दोनशे कंपन्यांना आर्थिक पाठबळ गुगल दिले त्यामध्ये मनोज जाधव यांच्या कृषीनामा या वेब पोर्टलचा समावेश आहे.

चांगल्या गोष्टीचे फळ मिळाले : जाधव

याबद्दल बोलताना enrich media प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज जाधव म्हणाले, गुगलकडून अशी मदत मिळने ही मोठी गोष्ट आहे. आम्ही सतत कंटेंटच्या दर्जावर भर देत आलो आहे. सातत्य व दर्जा या दोन गोष्टींवरच कृषीनामा पोर्टल उभे राहिले आहे. अशात गुगल कधी आपली निवड करेल याचा विचार केला नव्हता. परंतु शेवटी चांगल्या कामाचे फळ मिळाले असेच म्हणावे लागेल.

पुण्यात आहे कंपनी
enrich media प्रायव्हेट लिमिटेड ही पुणेस्थित कंपनी महाराष्ट्र व देशातील अनेक पोर्टलसोबत तांत्रिक मदत, रेव्हेन्यु जनरेशन, पोर्टल उभारणी तसेच सोशल मीडिया एंगेजमेंटसाठी काम करते. गेल्या तीन वर्षात १२० हुन अधिक पोर्टलसोबत ही कंपनी काम करत आहे. अशात कंपनीच्या स्वत:च्या पोर्टलला अशी मदत मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

अधिक जोमाने काम करू

येणाऱ्या काळात कृषीनामाच्या माध्यमातून अधिकाधिक कृषीविषयक कंटेंट निर्मितीचं काम केलं जाईल. उत्साह जसा वाढला आहे, तशी जबाबदारीही वाढली आहे, असे सांगत मनोज जाधव यांनी गुगल ला थॅंक्यू म्हटले आहे.

कोरोनातून आज 27 व्यक्ती बरे 11 बाधितांची भर तर एका महिलेचा मृत्यू

 

error: Content is protected !!