दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर व गोपाल कांबळे यांच्यासह अनेक दिव्यांग लोकांचा ‘मनसे’त प्रवेश….
हिंगणघाट,प्रतिनिधी :- हिंगणघाट शहरातील व जिल्हातील सामाजिक व संघटनात्मक कामात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर व गोपाल कांबळे यांच्यासह अनेक दिव्यांग लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश घेतला. हा पक्ष प्रवेश ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांच्या नेतृत्वात मनसे कार्यालय नंदोरी रोड येथे प्रागंणात पार पडला.
हिंगणघाट शहरातील अनेक दिव्यांग लोकांनी मोठ्या प्रमाणात ‘मनसे’त सहभागी होऊन पक्ष संघटीत व मजबूत करण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी पुष्पगुछ व मनसेचा झेंडा हाती देऊन त्यांना पुढील वाटचालीचा शुभेच्छा दिल्या. यांच्यासह अनेक दिव्यांग संतोषराव ठाकरे, अमोल कडे,शरद नांदे, विठ्ठल देशमुख, संजय दरबेसवार, किशोर सोनटक्के, जयंत कोल्हे, शुभम नलवडे इत्यादी लोकांनी मनसेत प्रवेश केला.
कार्यक्रमाचा आयोजनासाठी मनसे जिल्हाउपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हासचिव सुनील भुते, वा. सेना जिल्हासंघटक रमेश घंगारे, गजानन कलोडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे, लक्ष्मणजी सावरकर, आरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष उमेश नेवारे, मनसेशहराध्यक्ष राजू सिन्हा, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष राहुल सोरटे, अमोल मुडे, नरेश चिरकुटे, राजू मुडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.
प्रतिक्रिया :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिव्यांग लोकांचा पाठीशी आहे दिव्यांग लोकांना कोणतीही मदत असो आम्ही पूर्ण करू या पक्षात दिव्यांग युवकांना पुढे येऊन काम करण्याची संधी मा. राजसाहेब ठाकरे यांनी उपलब्ध करून दिलेली आहे अनेक युवक त्यात दिव्यांग लोकांची भर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आकर्षित झालेले दिसून येत आहे .
अतुल वांदिले जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धा
धक्कादायक; नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ