परभणी जिल्ह्यातील पहिलाच आमदार कोरोना पॉझिटिव, स्वतः आमदारांनी फेसबुक पेज वरून केले जाहीर
परभणी,प्रतिनिधी – जगभरात थैमान घातलेला कोव्हीड-१९ हा संसर्गजन्य आजार आता परभणी जिल्ह्यात चागलेच पाय पसरतांना दिसत असून मागील काही दिवसात दर दिवशी रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरीकां मध्ये चिंता दिसून येत आहे.शुक्रवारी रात्री विधान परीषदेचे आ बाबाजानी दुर्रांनी यांना अस्वस्थ वाटत असल्याने औरंगाबाद येथे नेले असता त्यांची तपासनी पॉझिटीव्ह अाली असल्याची माहीती स्वत: आ दुर्रांनी यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून जाहिर केले आहे.
आमदार बाबाजानी दुर्रानी हे दोन चार दिवसा पुर्वी एका लग्न सोहळ्या साठी नांदेडला गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परत येते वेळी त्यांना सर्दी झाल्याची जाणिव झाल्याने ते स्वत: सर्वां पासून वेगळे राहात होते. शेतातील फार्महाऊस वर ते एकटे राहिले. या नंतर स्वत:च्या वाढदिवसा निमित्त ही ते कोणा व्यक्तीला भेटले नाही. शुक्रवारी रात्री सर्दी ताप जास्त वाटत असल्या ने ते उपचारा साठी औरंगाबाद ला रवाना झाले या ठिकाणी कोव्हीड-१९ तपासनी केली असता ते पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले असल्याची फेसबुक वर पोष्ट केली आहे. या फेसबुक पोष्ट मध्ये ते म्हणतात की,
प्रिय सहकाऱ्यांनो,
सर्दी, ताप असल्या कारणाने मी कोविड-१९ची टेस्ट केली असता कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे कळले. औरंगाबाद येथील रुग्णालयात मी उपचार घेत आहे, आता माझी प्रकृती एकदम स्थिर असून कोणीही काळजी करू नये. आपल्या सर्वांचे असंख्य आशीर्वाद व सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत, त्या जोरावर लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन परत येईल.
तुम्हा सर्वांचं प्रेम आहे, त्याबद्दल मी ऋणी आहे परंतु कोणीही मला संपर्क करण्याचा व भेटण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती. तुम्ही सर्वजण आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, विनाकारण घराबाहेर पडू नका आणि प्रशासनास सहकार्य करा.
बीड जिल्ह्यातील पिकविम्यासंबंधीचा राज्यशासन आदेश जारी, पिकविमा हफ्ता स्वीकारण्यास सुरुवात