मोगरा येथील गोदावरी नदीत हजारो ब्रास अवैध वाळू उपसा ; महसूल पोलिस प्रशासन निद्रस्त

1 148

माजलगांव,(प्रतिनिधी):- तालुक्यातील मोगरा या गावालगत असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रातील हजारो ब्रास वाळू उपसा केला जात असून या मध्ये माजलगांव च्या वाळू माफिया सह मोगरा गावच्या माफियांचा समावेश असून या गावतील तरुण पिढी या पैश्या मुळे व्यसनाधीन झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत असून या कडे पोलीस व महसूल विभाग जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असून या कडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी संतप्त नागरिक करत असून असून लवकरच या विषयावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे गावकरी सांगतात आहेत.

या विषयी सविस्तर माहिती अशी की मोगरा हे गाव माजलगांव पासून २० कि मी असून या गावालगत गोदावरी नदी आहे या ठिकाणी वाळू भरपूर असलेल्या वाळू धक्या मध्ये या गावचा समावेश आहे या वर्षी सरकारने वाळू घाटाचे लिलावन केल्याने वाळूला सोन्याचे भाव मिळाला आहे.

५ च ब्रास च वाळू टीपर ५० हजार रुपयांला विकले जात आहे तसेच पिको , ४ चाकी अँटो , ट्रॅक्टर , अदी वाहन ही या बेकायदेशिर वाळू वाहतूक व्यवस्थे मध्ये गुंतले असून हे सर्व जन रात्रन दिवस वाळू वाहतूक करत आहेत मोगरा या गावात बहुसंख्ये घरी वाळूचे स्टॉक दिसत असून यातून वाळू विक्री टोपली वर होत आहे आणि हे अवेद्य पैसा दारू गांज्याचे व्यसनावर जात आहे.

तसेच अवैध वाहतूक करत असलेले वाहन वाळू उपसा करत असताना महसूल विभाग चे कर्मचारी अधिकारी यांना कोणी टीप दिली तर तात्काळ ही वाहने गायब होतात व मग पथक गावात येथे या मुळे या लोकांना खबर देणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत हे पाहणे गरजेचे आहे सर्व मिळून १ गाडी २ लक्ष रुपये हसा वाटप करते असे हे वाहन मालक सागत असून कोन कोन यात आहेत हे नावे उघड सागतात तसेच या मुळे आमचे काहीच होत नाही असेही छातीठोक सांगतात.

या मुळे कूपनच शेत खाते ही म्हण या वेळी लागू होते तसेच या वाळू उपसा मुळे या गावा चा रस्ता खराब झाला असून रस्त्याची चाळणी झाली आहे म्हणून महसूल व पोलीस प्रशासनाने या वाळू माफिया वर वेळीच कार्यवाही करून वाळू उपसा थांबवावा अशी मागणी गावकरी करीत आहेत .

केलेल्या दाढीचे पैसे मागितले सलूनचालक व कारागीर ला जखमी केले.

error: Content is protected !!