अंबरनाथ रेल्वे स्थानकावर शिवसेनेकडून महिला प्रवाशांंचे स्वागत
जाफर वणी
अंबरनाथ,दि 22 ःमहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांनी मुंबईच्या चाकरमाने महिला वर्गासाठी लोकल ट्रेन चालू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात केला होता. परंतु केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून या निर्णयास स्थगिती देण्यात आली होती. आपले पालकमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे ह्यांच्या पाठिंब्याने तसेच शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष सौ. मनिषा वाळेकर व महिला आघाडीच्या शहर संघटक मालती पवार व महिला आघाडीच्या पदाधिकारी , शिवसैनिक ह्यांनी रेल्वे प्रशासनास दि. 18 ऑक्टोबर 2020 रोजी निवेदनपत्र देऊन निर्णयास स्थगिती देण्याचे अधिकृत व समाधान कारक कारणे विचारण्यात आली होती. त्यानुसार परिणामी रेल्वे प्रशासनाने तातडीने हालचाली करून दि. 21 ऑक्टोबर पासून महिलांचा लोकल रेल्वे प्रवास मंजूर केला.
यासाठी दि. 22 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 च्या सुमारास अंबरनाथ शहराच्या माजी नगराध्यक्ष सौ. मनिषा वाळेकर व महिला आघाडीच्या शहर संघटक मालती पवार व महिला आघाडीच्या पदाधिकारी व इतर शिवसैनिक यांनी अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे महिला प्रवाशांसह रेल्वे स्टेशन मास्टर (प्रबंधक), आरपीएफ स्टॉफ ह्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. दरम्यान प्रकाश डावरे सर, संभाजी कळमकर, संजय गावडे, निता परदेशी, चंदा गाणं, सुषमा शेलार, सविता गावडे, सारीका वाळुंज, पुजारी अरूणा, सुषमा भाकरे, अनिता लोटे ह्यांच्यासह आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.