महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत – सौ.भावनाताई नखाते

0 172

पाथरी,दि 08 (प्रतिनिधी)ः
शिक्षण,कायद्याचे ज्ञान, आत्मविश्वास,आत्मनिर्भरता इत्यादी बाबीं स्त्रियांनी आत्मसात कराव्यात.स्वतःवर होणारा अन्याय सहन करू नये व स्वतःचे संरक्षण स्वतः करण्याचे धडे घ्यावेत असे प्रतिपादन परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या   सौ.भावनाताई नखाते यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 8 मार्च 2021 सोमवार रोजी श्रीमती शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे महिला सुरक्षा जनजागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पाथरी येथील नायब तहसीलदार वसुधा बागुल,अॅड.निमेश गोरे,पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण,रेखाताई मनेरे, प्रयाग वामन, कु.ऋतुजा शिंदे उपस्थित होत्या.
कु.ऋतुजा शिंदे हिने एकविसाव्या शतकातील स्त्रीने स्वतःचे अस्तित्व प्रकाशाने जपले पाहिजे असे विचार मांडले तर प्रमुख मार्गदर्शक अँड.निमेश गोरे यांनी महिलांनी अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी कायदेशीर बाबींचा आधार घेऊन अन्यायाला वाचा फोडली पाहिजे,स्त्रीला प्राप्त झालेल्या कायद्याचे संरक्षण व त्याची अंमलबजावणी या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांनी स्त्रियांना स्त्री विषयक भूमिका मांडताना अनेक उदाहरणे देऊन सक्षम पाऊल टाकले पाहिजे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम शेळके यांनी केले तर आभार कमल कांबळे यांनी मानले. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून कार्यक्रम संपन्न झाला.

error: Content is protected !!