कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सज्जतेचा इशारा

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

0 122

परभणी, प्रतिनिधी – कोरोनाचा चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन दिनांक 12 मार्च 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीस उपस्थित अधिकारी यांचा आरोग्य संस्था निहाय आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेता सर्वांनी नियोजनबद्ध काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिल्या

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊ नये या करिता प्रत्येक आरोग्य उपकेंद्राने दहा तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राने 25 आर टी पी सी आर घ्याव्यात, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग एकास 30 या प्रमाणे करण्यात यावी अश्या सूचना केल्या.

तसेच कोविड लसीकरणाचे काम अत्यल्प असल्याने आशा स्वयंसेविका मार्फत लाभार्थ्यांना बोलावून सदरील काम वाढविण्या बाबतचे नियोजन करावे अशा सूचना केल्या.

उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रसूती चे प्रमाणात सुधारणा करणे,टी बी चे जास्तीत जास्त संशयित शोधून थुंकी नमुने घेणे बाबतीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शंकरराव देशमुख यांनी उपस्थितांना सूचना केल्या.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदडकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ रावजी सोनवणे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ कालिदास निरस, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भाएकर,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ व्ही आर पाटील, उपस्थित होते.

error: Content is protected !!