आयआयबी पीसीबी-ब्रिजकोर्समुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला

0 119

 

नांदेड, गजानन जोशी – आपल्या अखंडपणे परिश्रमाने २१ वर्षांपासूनच्या गुणवत्तेचा सातत्याने वाढता आलेख व घराघरात पोहचलेल्या विश्वासार्हतामुळेच आताच विद्यार्थी हितासाठी चालू केलेल्या PCB ला सुद्धा केवळ चांगला प्रतिसाद नव्हे तर ब्रिज कोर्स मध्ये IIB इन्स्टिट्यूट देशातील पहिल्या पसंदीचे विद्यार्थी प्रिय इन्स्टिट्यूट ठरत आहे

विद्यार्थ्यांच्या बुद्धीमतेला चालना देणे , त्याच बरोबर आत्मविश्वास वाढवणे , शिकवलेले लक्षात कसे ठेवावे , कोणत्या विषयाचं अभ्यास कसा करावा , ह्या सारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींनवर अत्यंत लाभदायक मार्गदर्शक करत प्रत्येक वेळचं अभ्यासपूर्ण नियोजन करण्यात आले असून हा राज्यासह देशात एक नवीन मॉडेल निर्माण होत आहे.

बायोलॉजी प्रमाणेच केमिस्ट्री आणि फिजिक्स विषयाची शिकवणी उत्कृष्ट असून तज्ञ व अनुभवी टीम च्या मार्गदर्शनामुळे सर्व विषय अगदी सहज आत्मसात होत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालक देत आहेत यामुळे २०२३ मध्ये येणारा निकाल हा आत्तापर्यंत चे उच्चांक मोडीत काढणारा असेल अशी आशा आयआयबी व्यवस्थापनाने व्यक्त केली.

गतवर्षी तब्बल १२५३ विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणातील महत्वपूर्ण अशा MBBS अभ्यासक्रमासाठी देशभरातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. विद्यार्थ्यांना अधिकाधिक परिपक्व करण्यासाठी हे इन्स्टिट्यूट प्रत्येक वेळी विविधतापूर्ण व नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यात अग्रेसर असते. विद्यार्थी हितासाठी चालू केलेल्या PCB ला सुद्धा देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

इयत्ता ११ वी PCB बॅच २१ मे पासून सुरू होत आहे, त्या अनुषंगाने सध्या सुरू असलेला ऑनलाईन “ब्रिज कोर्स” हा खूपच उत्तम व पहिल्या पसंदीचे ठरत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्येक तासांचे नियोजन व अभ्यासाचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहेत.

ऑनलाईन शिकवणी असून सुद्धा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्लासरूम मध्ये शिकवणीचा अनुभूती येत आहे. कारण प्रत्येक लेक्चर हे आधुनिक अशा स्मार्ट बोर्ड वर शिकविले जात आहेत. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना ९ वी १० वी तील विज्ञान आणि गणित विषयांच्या अडीअडचणी देखील दूर करण्यात आल्या. दररोज विडिओ लेक्चर, वेळेचे पक्के नियोजन, व पूर्ण विडिओ पाहून कंटाळा येऊ नये म्हणून मध्ये ब्रेक दिला जातो.जे रोज शिकविले जाते त्याच्यावर असाईनमेंट देण्यात येतात. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्या असाईनमेंटचे सोल्युशनही दिले जाते.

यादरम्यान विद्यार्थ्यांना काही जरी अडचण आली तर इन्स्टिट्यूटच्या प्रत्येक विषयांच्या तज्ञ प्राध्यापकांचे मोबाईल नंबर देण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना, शिक्षकांशी वेळोवेळी संपर्क साधून त्यांच्या शंका व अडचणी तातडीने दूर करता येतात. विद्यार्थ्यांच्या वेळेचे पक्के व तंत्रशुद्ध पद्धतीने नियोजन करण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक विषय, विषयातील चॅप्टरचे सखोल अध्ययन होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार पुढच्या गुणवंत बॅचसाठी निवड केली जाते. विद्यार्थी – पालकांसाठी चर्चासत्रांचे आयोजन करून त्याद्वारेही मार्गदर्शन करण्यात येत आहे. टीम IIB कडून निर्माण करण्यात येत असलेल्या शिक्षणाच्या नवीन वाटा व नाविन्यपूर्ण कल्पनाशक्ती मुळे निश्चितच येणाऱ्या काळात शैक्षणिक क्षेत्रात एक नवीन क्रांती घडणार.

 

 

IIB च्या PCB “वन नेशन वन एक्झाम, वन कोर्स, वन क्लास”ला राज्यातूनच नव्हे तर पूर्ण देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. देशपातळीवर तज्ञ अध्यापकांकडून पूर्ण PCB चे मार्गदर्शन, पॉईंट टू पॉईंट शिकवणी आणि परिपूर्ण अभ्यास, सराव अशा प्रकारे तयारी करून घेतली जाणार आहे. आतापर्यंत केवळ बायोलॉजी ची तयारी करून घेतली जात होती. मात्र, आता PCB ची संपूर्ण तयारी करणार असल्यामुळे १००% यश संपादन करण्याचा विश्वास आहे. यापुढे सर्वाधिक डॉक्टर्स महाराष्ट्र राज्यातून घडतील अशी खात्री आहे.
– दशरथ पाटील,
व्यवस्थापकीय संचालक
आयआयबी नांदेड-लातूर

error: Content is protected !!