कारागृहातील कैद्यांसाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी औषधांचे 450 डोस सुपूर्द- एचएआरसी संस्थेचा उपक्रम
परभणी,दि 21 (प्रतिनिधी)ः
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्था परभणी तर्फे कोरोणा आजारांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा सुचवलेले होमिओपॅथिक औषध ‘आर्सेनिकम अल्बम 30’ चे 450 vials येथील जिल्हा कारागृहातील कैद्यांना वाटप करण्यासाठी कारागृह अधीक्षक गोविंद राठोड यांच्याकडे सुपूर्द केले.
कोरोना तसेच फ्लू सारख्या संर्सगजन्य आजारात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिकम अल्बम 30 हे होमिओपॅथीक औषध उपयोगी पडत असल्याने केंद्रीय आयुष मंत्रालयाने देखील याचा वापर करण्याची सुचना केली आहे.त्यामुळे हे औषधी जिल्हा कारागृहातील कैद्यांना देण्यासाठी आज शुक्रवारी जिल्हा कारागृह अधीक्षकांकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक व राजेश्वर वासलवार, जेलर श्री निकम, उमीनवाड ( फार्मासिस्ट) व कारागृहातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
मागील वर्षी एचएआरसी संस्थे तर्फे परभणी जिल्ह्यातील 6000 कोरोना योद्धांना ज्यात प्रामुख्याने 1800 पोलीस कर्मचारी, 700 मनपा सफाई कर्मचारी, 1700 अंगणवाडी सेविका, 1000 एचआयव्ही ग्रस्त अनाथ बालके, 1040 आशा सेविका, पत्रकार व वृत्तपत्रे वितरण करणाऱ्या बांधवाना Arsenic Album30 वाटप करण्यात आले होते. ज्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
दुसऱ्या लाटेत एचएआरसी संस्थे तर्फे लोकसहभागातून जमा निधीतून विकत घेतलेल्या 3 ऑक्सिजन concentrator द्वारे पोस्ट कोविद रुग्णांना घरपोच ऑक्सिजन पुरविणे सुरू आहे. ज्याचा अनेक पोस्ट कोविद रुग्णांना लाभ होत आहे.
होमिओपॅथिक औषधांनी कसा करावा प्रतिबंध ?
जागतिक आरोग्य संघटनेने या कोरोना संसर्गजन्य आजाराविषयी जी माहिती दिली आहे, त्यातील लक्षणावर आधारित सेंट्रल कॉउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीच्या एक्स्पर्ट पॅनल अभ्यास करून आर्सेनिक अल्बम ३० हे औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सर्वच वयाच्या नागरिकांना देण्याचे सुचवले आहे. हे औषध लहान बाळ, लहान मुले, वयोवृद्ध, गरोदर स्त्रिया आणि कोणत्याही रोगाच्या रुग्णासाठी सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्पपरिणाम होत नाहीत. हे औषध देणे अत्यंत सुलभ असून त्याच्या कोणत्याही मात्रेमुळे इतर औषधोपचारामध्ये कोणताही व्यत्यय येत नाही.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधाची मात्रा
प्रौढांना चार गोळी सकाळी व सायंकाळी तीन दिवस
लहान मुलांना दोन गोळी उपाशीपोटी तीन दिवस
जर या विषाणूचा त्या भागात प्रादुर्भाव असेल तर पुन्हा ३० दिवसांनी ते घेऊ शकता.
येणाऱ्या काही दिवसांत संस्थे तर्फे जिथे गरज आहे तिथे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या होमिओपॅथिक औषधीचे वाटप करण्यात येणार आहे- डॉ. पवन चांडक,अध्यक्ष -एचएआरसी