कन्हैया उद्योगसमूहाने केली कोविड सेंटरला विविध वस्तुंची मदत
अमोल मांडण
नेवासा,दि 23 ः
निघोज (ता.पारनेर) येथील कन्हैया उद्योगसमूहाने पारनेर तालुक्यातील कोविड सेंटरला आर्थिक मदतीसह दूध, प्रोटीनयुक्त पदार्थांसह इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. ते कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणावर मदत करत आहोत. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारे गाजावाजा केलेला नाही.
निघोज येथील शेतकरी कुटुंबातील मच्छिंद्र लंके यांच्या माध्यमातून कन्हैया उद्योगसमूहाने अनेक अडचणींवर मात करत देश-विदेशात गगन भरारी घेतली आहे. कन्हैयाकडून लॉकडाऊन काळातही हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. सध्या कोरोनाच्या काळात ते कोविड सेंटरला कोणताही गाजावाजा न करता आर्थिक मदतीसह दूध इतर वस्तूंची मदत करत आहेत.
ही माहिती तालुक्यातील कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाकडूनच देण्यात आली.कन्हैया उद्योगसमूह व्यवसायात प्रगती करत असताना सामाजिक बांधिलकी जपत अल्याचा आम्हा पारनेरकरांना सार्थ अभिमान असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.१९९३ दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी कन्हैया उद्योगसमूहाचे संस्थापक मच्छिंद्र लंके, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष इधाटे, रावसाहेब वराळ, बाळासाहेब खोसे, विजय गुंड, ठकाराम गायखे, राजेंद्र लेंभे, विश्वास लंके, शिवा वराळ यांनी ६३ हजारांचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर संदीप पाटील जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ यांच्याकडे सुपुर्द केले.
आपल्या देशात मोठमोठी दानशूर व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा आर्दश घेऊन आपापल्या परीने प्रत्येकाने कोरोनाकाळात छोटी-छोटी मदत करणे आपले आद्य कर्तव्य आहे.
मच्छिंद्र लंके,संस्थापक, कन्हैया उद्योगसमूह, निघोज.