मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे बंद करा- संजय सुखदान यांचा डॉक्टरांना इशारा.
नेवासा,दि 23(प्रतिनिधी)ः
वंचित बहुजन आघाडीचे नेते कोरोना या जागतिक महामारीने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असताना भारतामध्येही दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचं प्रमाण भयंकर प्रमाणात वाढले आहे .महाराष्ट्रामध्ये याची परिस्थिती तर अतिशय बिकट बनत चालली आहे .पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत.ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत .आणि अशा परिस्थितीमध्ये नेवासा तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनची सोय आहे म्हणून रुग्ण ॲडमिट होताना दिसत आहेत .परंतु शासनाने काही गाइडलाइन्स घालून दिलेल्या असतानासुद्धा वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर मात्र अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी करत आहेत .नेवासा फाटा येथील अनेक कोविड हॉस्पीटलमध्ये रुग्णांची अशाच प्रकारे हेळसांड होताना दिसत आहे.अशीच काहीशी घटना एका पीडित व्यक्तीने वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखधान यांच्याकडे जाऊन आपली कैफियत मांडली .आणि लागलीच आक्रमक भूमिका घेत सुखधान यांनीही नेहमीप्रमाणे सदर डॉक्टरांना दूरध्वनी करून जर दोन दिवसांत तुम्ही तुमच्या बिलांच्या आकारणीमध्ये सुधारणा केली नाही तर निर्वस्त्र करून धिंड काढण्याचा धमकीवजा इशारा दिला.सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या क्लिपने मात्र नेवासा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून डॉक्टरांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
सुखधान यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे डॉक्टर लोकांची मात्र पुरती भंबेरी उडाली.त्यामुळे आता येणार्या काळात डॉक्टर आपल्या भूमिकेत बदल करतील का ?सर्वसामान्य जनतेची होणारी लूट थांबेल का?असा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित होत असून वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांच्या भूमिकेचे मात्र सगळीकडे स्वागत होत आहे .
कोविड सेंटरच्या डॉक्टरांना फोन करून तसे निर्देश दिलेले आहे की, रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले घेऊ नये. दोन दिवसात जर त्यांनी परिस्थिती सुधारली नाही तर बघा त्यांना अशी चेतावणी देण्यात आली.
संजय सुखधान.
युवा नेते,वंचित बहुजन आघाडी