कोरोना योद्ध्यांचा आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते सत्कार

0 77

परभणी,दि 23 (प्रतिनिधी)ः  शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या परभणी शहरातील तिन्ही कोवीड सेंटर मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दररोज भोजन व्यवस्थेची कामगिरी चोखपणे बजावणार्या कोरोनायोद्धा शिवसैनिकांचा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते रविवार 23 मे रोजी सत्कार करण्यात आला. शिवाजीनगर येथील आमदार संपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, उपजिल्हाप्रमुख संजय घाडगे, माजी शहरप्रमुख अनिल डहाळे ,माजी नगरसेवक नवनीत पाचपोर ,अरविंद काका देशमुख आदी उपस्थित होते. एक मे महाराष्ट्र दिना पासून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या सौजन्याने शहरातील तिन्ही कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे .सकाळ संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस देण्यात येणाऱ्या भोजन व्यवस्थेची प्रमुख जबाबदारी शिवसेना माजी शहरप्रमुख अनिल डहाळे आणि माजी नगरसेवक नवनीत पाचपोर यांच्याकडे देण्यात आली आहे . आज पर्यंत पंधरा हजार जणांनी याचा लाभ घेतला असून संपूर्ण महामारी असेपर्यंत ही सेवा सुरू ठेवणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच शिवसैनिक आणि युवा सैनिकांनी गेल्या 22 दिवसां पासून स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांच्या नातेवाईकांची भोजन व्यवस्थेची कामगिरी उत्तम पणे पार पाडल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. यावेळी मनपा गटनेते चंदू शिंदे, युवा सेना शहर प्रमुख विशू डहाळे, उपशहर प्रमुख संभानाथ काळे, उद्धव मोहिते ,मारुती तिथे ,राहुल खटिंग, मनोज पवार ,पांडुरंग देशमुख .दिलीप गिराम ,संदीप पांगारकर ,तुषार चोभारकर, बाळासाहेब गोडबोले ,गौतम भराडे, मकरंद कुलकर्णी ,स्वप्नील भारती, प्रशांत शिंदे ,राहुल कांबळे ,राहुल गायकवाड ,गणेश सोळुंके ,असलम शेख ,गणेश मुळे, सतीश फडके ,तुराबखान ,सुरज ढोके, जीवन पैठणकर ,रुषी सावंत,आदी शिवसैनिक कोरोना योद्ध्याँचा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!