म्युकरमायकोसिस आजारावरील ॲंटीफंगस औषधांचा आवश्यक पुरवठा करा.-आ. रत्नाकर गुट्टे
परभणी,दि 23 (प्रतिनिधी)ः
सध्या परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने सर्वसाधारण जनतेचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. त्यामध्येच आता म्युकरमायकोसिस नावाचा नवीन रोग डोकेवर काढत आहे. कोविड नंतर म्युकरमायकोसिस या आजाराचा फैलाव परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रत होत असून कोरोणावर मात केलेल्या रुग्णांमध्ये या आजाराचा संसर्ग वाढत चालला आहे. नाक,डोळे, मेंदू,गालावर सूज,जबड्यावर सूज, टाळू त्वचेचा रंग काळसर होणे. श्वासोश्वास आणि त्वचेच्या माध्यमातून शरीरात व फुप्फुसांमध्ये प्रवेश करून फंगल इन्फेक्शन होऊन अशा बुरशीजन्य आजारामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे.
सदरील आजारावरील एम्फोटेरिसिन- बी या औषधाचा बाजारात तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांना अति वाढीव दराने औषध खरेदी करावे लागत आहे. हा आजार कोणत्याही शासकीय आरोग्य योजनेत येत नसल्याने नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. केंद्राने राज्य सरकारांना म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस ) या आजारास महामारी घोषित करण्याचे निर्देश दिले असल्याने रुग्णांना औषधोपचार व देखभाल मोफत करणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे.
याकरिता रुग्णांना दिलासा देण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची अत्यंत गरज आहे. भविष्यात covid-19 सारखा न्यूकरमायक्रोसिस या आजाराचा प्रसार अतीवेगाने होऊ नये व यास वेळीच आळा घालता यावा यासाठी परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एम्फोटेरिसिन- बी (ॲंटी फंगस) या औषधाचा आवश्यक पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री मा.ना. राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.