पसायदान निरुपण महोत्सवाची सटाणा येथे सांप्रदायिक वातावरणात सांगता
भजन महोत्सवातील गुणीजनांचा सन्मान व नियुक्ती पत्र वाटप
रामभाऊ आवारे
निफाड,दि 05ः
अखिल भारतीय वारकरी मंडळ व संतचरीत्र गृपच्या संयुक्त विद्यमाने व अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सर्व भाविकांच्या सहयोगातून २५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२१ या पूर्वकाळात पसायदान निरूपण महोत्सव प्रारंभ करण्यात आला होता. दररोज रात्री ९ ते १० या वेळेत ऑनलाइन पद्धतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सांगता आज श्रीक्षेत्र सटाणा येथे देव मामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान मंदिर कार्यालयात शासनाच्या नियमांचे पालन करून देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक विभागीय अध्यक्ष तथा संत चरित्र ग्रुपचे मुख्य संचालक हरिभक्तिपरायण वाल्मिक महाराज जाधव ब्राह्मणगाव सटाणा यांच्या काल्याच्या किर्तनाने संप्रदायिक वातावरणात मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात आली असल्याची माहिती संत चरित्र गृप निर्माते ज्ञानेश्वर माऊली सोनवणे व संत चरित्र गृप महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख तथा निफाड तालुका प्रतिनिधी रामभाऊ आवारे यांनी दिली आहे.
सांगता कार्यक्रमात माऊली ज्ञानोबा- जगद्गुरु तुकोबा भजन महोत्सवात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील विविध भजनी मंडळातील गुणीजनांचा सन्मान पत्र तसेच सटाणा तालुका कार्यकारणी नियुक्तीपत्र वाटप अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक विभागीय अध्यक्ष वाल्मिक महाराज जाधव,देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड,ज्ञानेश्वर माऊली सोनवणे,रामभाऊ आवारे ,सटाणा तालुका अध्यक्ष हभप रामचंद्र महाराज नंदन आदींच्या हस्ते वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक विभागीय अध्यक्ष वाल्मिक महाराज जाधव, ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, रामभाऊ आवारे सर,सटाणा तालुका अध्यक्ष हभप नंदन सर ताहाराबाद, विशेष तंत्रज्ञ रावसाहेब जगताप,हभप काशिनाथ महाराज मोरे यांचा देवमामलेदार देवस्थानच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड व विश्वस्त मंडळाच्या वतीने यशवंत लिलामृत ग्रंथ देऊन तर संत चरित्र गृपच्या वतीने देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड,हभप वाल्मीक महाराज जाधव,हभप नंदन यांचा गृप निर्माते ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, हभप काशिनाथ महाराज मोरे कोपरगाव, रावसाहेब जगताप
यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले, प्रदेशाध्यक्ष प्रेम मूर्ती हभप अनिल अण्णा वाळके यांच्या प्रेरणेने व नाशिक विभागीय अध्यक्ष हभप वाल्मिक महाराज जाधव, नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष हभप शारदाताई सूर्यवंशी यांच्या कुशल मार्गदर्शनाने संत चरित्र ग्रुप निर्माते हभप ज्ञानेश्वर माऊली सोनवणे व संत मीराबाई चरित्र लेखिका हभप भागवतानुरागी कविताताई साबळे यांच्या संकल्पनेतून मुख्य संयोजक रामभाऊ आवारे वनसगाव, ह भ प राम महाराज उदागे नगर, हभप रावसाहेब जगताप, शंकर कोल्हे,तेजस माऊली जाधव,पलाश आवारे वनसगाव, प्रसाद जाधव आदींसह वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन भक्तगण व माता भगिनीच्या वतीने करण्यात आले होते.
ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या पसायदान निरुपण महोत्सवात महाप्रसादाचे आयोजन देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्टचे वतीने करण्यात आले होते.यावेळी तंत्रज्ञ ह,भ,प,रावसाहेब महाराज जगताप, ह,भ,प,काशिनाथ महाराज कोपरगांव,हभप रामचंद्र महाराज नंदन सर, सटाणा ता उपाध्यक्ष आबा महाराज सोनवणे,देवळा तालुका अध्यक्ष ह,भ,प,भाउसाहेब आहिरे ,
गुणिजन,गोरख महाराज,राजु महाराज,तुलसीदास महाराज,कैलास म,खैरणार, शिवानंद जाधव,तेजस माऊली, ज्योतीराव बागुल,सुनिल चव्हाण,आदींसह ता, कार्यकारणी सदस्य व वारकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ आवारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांनी मानले.
तमाम ऑनलाइन भाविकांकडून असेच सहकार्य व आशिर्वादाची अपेक्षा–
कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व मंदिरे व किर्तन भजन प्रवचनांना व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली असून साधू संतांचे विचार तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पर्यंत पोहोचावी ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून अखिल भारतीय वारकरी मंडळ व संत चरित्र ग्रुपच्या वतीने राबविण्यात आलेले सर्व ऑनलाईन महोत्सवासाठी महाराष्ट्रातील तमाम ऑनलाइन भक्तिविधाते, सज्जन मायबाप ,बंधू भगिनींनी अखिल भारतीय वारकरी मंडळ व संत चरित्र ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचही ऑनलाइन पर्वाला खूप खूप सहकार्य लाभले असून यापुढील काळातही होणाऱ्या ऑनलाईन कार्यक्रमासाठी भाविकांकडून अशीच सहकार्य व आशीर्वादाची अपेक्षा.
रामभाऊ आवारे – महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख संतचरीत्र गृप