रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) बदलापूर शहर युवक अध्यक्ष सचिन कोकणे तसेच शहर अध्यक्ष संदीप भालेराव ह्यांची नियुक्ती

0 138

बदलापूर, जाफर वणू – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे ह्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कार्यालयात सचिनभाऊ कोकणे व संदीपभाऊ भालेराव ह्यांनी पक्षात जाहिर प्रवेश केला. सदरवेळी राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे ह्यांच्या हस्ते प्रसिध्द उद्योजक तथा बदलापूरचे सामाजिक युवानेते सचिनभाऊ कोकणे ह्यांची “बदलापूर शहर युवक अध्यक्ष” पदी तसेच संदीपभाऊ भालेराव ह्यांची “बदलापूर शहर अध्यक्ष” पदी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती झाल्यानंतर बदलापूर सहित जवळपास सर्व क्षेत्रातून त्यांना फेसबुक तथा व्हॅट्सअपवर अभिनंदन करून प्रत्यक्ष भेट देत शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या हस्ते “भारतीय संविधानाची उद्देशिका” या ग्रंथाचे अनावरण करण्यात आले. या नियुक्ती दरम्यान महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, महीला अध्यक्ष सूनिताताई चव्हाण, कर्मवीर सुनील खांबे ह्यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!