बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांना प्रबोधनाची गरज-मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर
रामभाऊ आवारे
निफाड,दि 23ः
आजकालच्या धावपळीच्या व विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये समाजव्यवस्था दिवसेंदिवस मोबाईल सारख्या चैनीच्या गोष्टींकडे व्यस्त झाली असून खासकरून यात तरुण वर्ग यांचा अधिक समावेश असल्याने तरुणांचे आयुष्य एका वेगळ्याच वळणावर पोहोचते की काय ? असेच वाटू लागले आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांपासून सर्वाचाच मोबाईलचा वापर अधिक वाढला आहे.खरं तर आज या भरकटलेल्या जगाला दिशा देणे महत्त्वाचे असुन बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांना प्रबोधनाची गरज आहे असे विचार न्यू दारणा हायस्कूल चे मुख्याध्यापक तथा शिक्षक भारती जिल्हा उपाध्यक्ष गोरखनाथ कुणगर (नाशिक) यांनी दैनिक शब्दराजचे निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे (वनसगाव) यांच्याशी बोलताना व्यक्त केले आहे .
आजकालच्या वास्तव परिस्थितीचं वर्णन करत असताना अतिशय दुर्बल स्वरुपाच्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडतात.आजची तारुण्यावस्थेत असलेली पिढी ही जिवन सौख्याच्या वाम मार्गाने प्रवास करताना दिसत आहे. नव्हे नव्हे विविध स्वरुपाच्या व्यसनाच्या आहारी जाऊन शारिरीक दुर्बलतेला आव्हान देण्याच काम करताना दिसून येते, बहूविध व्यसनाधीन लोकांचे तर कुटुंब उद्ध्वस्त झालेले दिसुन येतात ,खर तर तरुणांना आपल्याला लाभलेल्या या अनमोल शरीराचे मोल नसल्याचे प्रकर्शाने जाणवते .खरं तर आज या भरकटलेल्या जगाला दिशा देणे महत्त्वाचे असुन बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांना प्रबोधनाची गरज आहे असे विचार न्यू दारणा हायस्कूल चे मुख्याध्यापक तथा शिक्षक भारती जिल्हा उपाध्यक्ष गोरखनाथ कुणगर (नाशिक) यांनी दैनिक शब्दराजचे निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे (वनसगाव) यांच्याशी बोलताना व्यक्त केले आहे .
ते पुढे म्हणाले की, अध्यात्मिक कार्यामध्ये तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून बालवयातच त्यांना शाळेतूनच अध्यात्माचे ज्ञान देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बालवयात त्यांना अध्यात्माची शिक्षण दिले गेले तर निश्चितच त्यांच्यामध्ये सात्विक गुण निर्माण होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे तमाम तरुणांना ज्ञानोबा- तुकोबारायां सारख्या संताचे चरित्र्य ऐकण्याची आवश्यकता आहे .काळाच्या ओघात चुकिच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या लोकांना आज प्रबोधानाची गरज आहे , संतांनी आपल्या अगदी कमी वयात या जगाचा विचार करत समाज सेवेच कार्य हाती घेतले परंतू आजची परिस्थिती बदलली आहे आपले संपुर्ण वय निघन जाते परंतू कुणाला मदतीतीचा हात देखील देत नाही ,छत्रपती शिवरायांच्या चरित्र्याचा विचार करता काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात की शत्रूच्या राज्यातील स्रियांना मातेसमान लेखनारा राजा या महाराष्ट्रात होऊन गेला ,ज्या महाराष्ट्र राज्याचे आपण पायिक आहोत आपण नाही त्यांच अनुकरण करु शकत परंतू त्यांच्या पाऊलावर पाउल ठेऊन चालण्याचा प्रयत्न करु शकतो ,म्हणून या स्वतंत्र्य भारताचे आपण रहिवासी असुन प्रत्येक गोष्टीचे स्वतंत्र्य आधिकार आपल्याला घटनेने दिले आहेत. आपण आपले निर्णय स्वतंत्र्यरित्या घेऊ शकतो या अनुषंगाने आपण कुठल्यातरी सामाजिक कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली तर खरी आपल्या जीवनाची सार्थकता सफल झाल्याचे सूख आपल्याला प्राप्त होते , आज सिमेवर लढणारा प्रत्येक सैनिक हा भारत मातेच्या संरक्षणाची जबाबदारी स्विकारून आपल्या जिवाची पर्वा न करता लढा देत आहे, आपल्या नजरेसमोर फक्त एकच दृष्टीकोन असतो की आज माझ्या भारतभूमीतील प्रत्येक कुटुंब हे सुखी समाधानाने जगू शकेल ,कुठल्याही स्वरुपाची स्वार्थी भावना डोळ्यासमोर न ठेवता अखंडकाळ भारतमातेची सेवा करतात .देशातील प्रत्येक तरुणाने असा विचार केला तर नक्कीच देशात होनारे गुन्हे कुठे तरी आटोक्यात येतील यासाठी प्रत्येक तरुणाने आपल्या या अनमोल देहाचा सामाजिक सेवा दृष्टीकोनातून आवश्यक त्या ठिकानी वापर केला तर संपुर्ण भारत देश हा एकजुटीने राहिल यासाठी सुखमय जीवनाची प्राप्ती करुन घेणे गरजेचे आहे. आपले भावी आयुष्य सुखासमाधानाने जगायचे असेल तर तरुणांनी सात्विक विचाराचा आपल्या जीवनात उपयोग करून सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळविणे तितकेच महत्त्वाचे आहे.