नेवासा तहसीलदारांवर होणार का गुन्हा दाखल ? कोरोना नियम दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितच मोडला
नेवासा, अमोल मांडण – नेवासा तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या उपस्थितीतच कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या नियमांचे उल्लंघन पंचायत समिती सभागृहात व प्रांगणात गुरुवार (दि.२३) रोजी रेशनकार्ड वाटपाच्या कार्यक्रमात मोडण्यात आलेले असतांना उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी ही गर्दी ‘ऑंखो देखे हाल’ बघितलेली होती तरीही पोलिसांनी ‘हाताची घडी,तोंडावर बोट’ ठेवल्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांसह तहलिलदार व काही राजकिय रथी – महारथींवर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन नेवासा पोलिसांना आज शनिवार (दि.२५) रोजी दिले आहे गुन्हा दाखल न केल्यास भाजपाच्यावतीने सोमवार (दि.२७) रोजी घंटानाद आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला असून पुन्हा एकदा ‘खाकीवर्दी’ नियमांच्या कचाट्यात अडकणार असल्याचे चिञ राजकिय गदारोळातून समोर येतांना दिसून येत आहे.
नेवासा पंचायत समिती सभागृहात व प्रांगणात रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्रम तहसिलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला होता.या कार्यक्रमास राजकिय रथी – महारथी उपस्थित होते.या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झालेली असल्यामुळे कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाचे नियम व अट्टी गुंडाळून ठेवण्यात आलेल्या होत्या.त्यामुळे वंचित बहूजन आघाडीचे युवा नेते संजय सुखधान यांनी अधिकाऱ्यांचा निषेध करत काळे झेंडे दाखवत पंचायत समिती प्रांगणातून थेट सभागृहात प्रवेश करुन अधिकाऱ्यांना जाब विचारलेला होता.त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची पाचावरधारण बसलेली होती.आता नेवासा तालूका भाजपाचे अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांच्या शिष्ठमंडळाने नेवासा पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देवून कोरोनाचा नियम मोडणाऱ्या तहसिलदारांसह ऱाजकिय नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.राजाश्रयाच्या दबावामुळे रितसर मागणी होवूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास पुन्हा नेवाशात आंदोलनाचा ‘भडका’ पेटणार असून पुन्हा एकदा पोलिस प्रशासनावर आगपाखड होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.नेवासा पोलिस ठाण्यात भाजपाने दिलेल्या निवेदनाप्रसंगी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे,अनुसूचित विभागाचे तालूकाध्यक्ष येडूभाऊ सोनवणे,शहराध्यक्ष मनोज पारखे,किसान मोर्चाचे तालूकाध्यक्ष ऋषीकेश शेटे,शहर उपाध्यक्ष राजेश कडू आदींचा समावेश होता.