Malaika Arora झाली ‘भारतीय नारी’, सेक्विन साडीमध्ये मलायकाचा जलवा
बॉलिवूडमध्ये जेव्हा फॅशनची गोष्ट येते त्यावेळी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून मलायका अरोराचं नाव घेतलं जात. आपल्या फॅशन आणि स्टाइलबाबत नेहमी जागरुक असणारी मलायका नेहमी इतरांपेक्षा काहीतरी क्लासी आणि हटके ट्राय करताना दिसते. मलायका तिच्या फिटनेस आणि फॅशनबाबतही नेहमी चर्चेत असते. मलायका बोल्ड, सेक्सी अंदाच अनेकांना घायाळ करतो. अशातच मलायकाने आता मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या नव्या मल्टी सेक्विन फॉरेस्ट ग्रीन साडीतील लूकने चाहत्यांना अधिकच घायाळ केले आहे.