आता नशिबाने तेच मुख्यमंत्री आहेत’.केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले…

0 123

परभणी,दि 03 ः
मागच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे, कशाला करता पंचनामे, काय लावला पंचनामा ? असा सवाल करत शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी केली होती. आता नशिबाने तेच मुख्यमंत्री आहेत’. त्यामुळे त्यांच्याच शब्दात त्यांना सांगतोय, की आता तुम्ही वाट बघू नका, पंचनामे न करता शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये सरसकट मदत द्या, अशी मागणी भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

श्री.दानवे यांनी रविवारी परभणी तालुक्यातील दैठणा,पोखर्णी,गंगाखेड तालुक्यातील सायाळा आदी भागात पाहणी केली.यावेळी गंगाखेड आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे,पाथरीचे माजी आमदार मोहन फड आदी उपस्थित होते.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.तसेच त्यांनी राज्यसरकारवर टिकास्त्र सोडले.

मदत न मिळाल्यास शेतकरी रब्बीची पेरणी करू शकत नाही
मराठवाड्यात तीन टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जेव्हा पाऊस पडला त्याचवेळी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती. मात्र, अद्याप मदत मिळालेले नाही. आता तिसऱ्या टप्प्यात देखील पाऊस झाला, हा पाऊस इतका भयानक होता की, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक देखील वाया गेले. त्यामुळे आता जर शासनाने शेतकऱ्यांना वेळीच मदत केली नाही, तर शेतकरी रब्बीची पेरणी करू शकत नाही, एवढी वाईट परिस्थिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांची असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.

शेतकऱ्यांचे सगळंच नुकसान झाले आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसगट 50 हजार रुपये एकरी मदत दिली पाहिजे, शिवाय जी जमीन खरडून गेली आहे. त्याचे पंचनामे वेगळे करून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. असे म्हणत ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुखयमंत्री होते, त्यावेळेस उद्धव ठाकरे हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पंचनामे कशाला करता, शेतकऱ्यांना सरसगट 50 हजार रुपये द्या असे म्हंटल होत. आता नशिबाने ते स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांचेच शब्द त्यांना संगतो आहे. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचा पूर्वीच्या भाषणाची आठवण करून देत, तुम्ही आता वाट बघू नाका, पंचनामे करू नका, शेतकऱ्यांना सरसगट 50 हजार रुपये एकरी नुकसान भरपाई दिली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करा आणि खरिपासाठी घेतलेले कर्ज माफ करा अशी मागणी केली आहे.

error: Content is protected !!