काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या अटकेचा निषेधार्थ झिरो फाटा येथे काँग्रेसने केला रास्ता रोको

0 150

परभणी,दि 05 (प्रतिनिधी)ः
परभणी – वसमत राष्ट्रीय महामार्गावरील पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथे मंगळवारी (दि.पाच) काँग्रेस सेवादलाचे प्रदेश सचिव व्यंकटेश काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी  रास्ता रोको करत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या अटकेचा निषेध केला.
उत्तर प्रदेशमधील लखिमपुर खारी येथे शेतकरी आंदोलन दरम्यान झालेल्या घटनेनंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेच्या निषेधार्थ झिरो फाटा येथे मंगळवारी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यंकटेश काळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार हुकूमशाही प्रमाणे वागत असून लोकशाहीचा खून केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.संजय लोलगे, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश देसाई, उपाध्यक्ष प्रक्षित सवनेकर, हिंगोली जिल्हा महासचिव पुष्पक देशमुख, शेख गौस, सय्यद आसेफ, किशन काळे, प्रदुम्न काळे आदी सहभागी झाले होते.

 									
error: Content is protected !!