राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध
परभणी, प्रतिनिधी – शहरातील शिवाजी महाराज पुतळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
मागील अनेक दिवसांपासून पालक मंत्री नवाब मलिक साहेब यांना विनाकारण बदनाम करण्याचे काम फडणवीस व त्यांच्या साथीदारांकडून होत आहे.परंतु मुळात फडणवीस मुख्यमंत्री असताना यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत मुन्ना यादव व हैदर यासारख्या गुन्हेगारी वृत्ती असणाऱ्या व्यक्तींना सोबत घेऊन मुंबईत वसुलीचे काम केलेले आहे. आता त्यांची नवाब मलिक यांच्याकडून पोलखोल होत असल्याने फडणवीस विनाकारण नवाब मलिक यांनी बदनाम करून जातीय तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्यावर खोटे आरोप लावत आहेत या गोष्टीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने फडणवीसांच्या पुतळ्यास जोडे मारून निषेध करण्यात आला. या आंदोलनात परभणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख ,महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई राठोड, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष कृष्णा कटारे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष, सुमंत वाघ सामाजिक न्याय विभाग रवी भोकरे, राजशेलार,वैभव वाकळे योगेश गायकवाड सिद्धांत हाके संयम जैन,, इम्तियाज शेख , परवीन खान, सुमित्रा लजडे यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते