मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी परभणीतून 100 रुग्ण मुंबईला रवाना
परभणी,19 प्रतिनिधी
मोतीबिंदू मुक्त परभणी मतदार संघ या संकल्पनेअंतर्गत शस्त्रक्रिया करण्यासाठी 100 रुग्णांची तुकडी दि.19 डिसेंबर रवीवार रोजी मुंबई येथे रेल्वेने रवाना करण्यात आली. परभणी रेल्वे स्थानकावर या सर्व रुग्णांना निरोप देण्यासाठी छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संयोजक आ.डाॕ.राहुल पाटील, एडवोकेट अशोक सोनी, सहसंपर्कप्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, माजी जिल्हा प्रमुख राजु कापसे, रवीन्द्र पतंगे,आय एम ए चे अध्यक्ष डॉक्टर कान्हे पाटील, डॉक्टर दिनेश भुतडा, तालुकाप्रमुख नंदू पाटील , मनपा सदस्य चंदू शिंदे, प्रशांस ठाकूर,सुशील कांबळे, शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, युवासेना शहर प्रमुख बाळराजे तळेकर ,विशू डहाळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की शिवसेनेच्या वतीने पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि त्यांचे सहकारी तज्ज्ञ डाॕक्टर परभणी येथे ऑक्टोबर महिन्यात घेण्यात नेत्र तपासणी शिबिरातील निवड करण्यात आलेल्या सुमारे अडीच हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करत आहेत. त्यापैकी आज तागायत 500 रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. यावेळी एडवोकेट अशोक सोनी , डॉक्टर कान्हे पाटील डॉक्टर दिनेश भूतडा यांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत सर्व रुग्णांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करण्यात आले. सनपुरी येथील पाच वर्षाची रुग्ण कुमारी शेख अलिषा शेख दस्तगीर हिच्या हस्ते केक कापण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी उपशहर प्रमुख संभानाथ काळे ,मारुती तिथे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पंढरकर, आदी मुंबईला रवाना झाले आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्धव मोहिते, गणेश मुळे ,नवनीत पाचपोर ,दिलीप गिराम, सुभाष जोंधळे, अमोल गायकवाड, गौतम भराडे, केदार दुधारे, अशोक गव्हाणे, मकरंद कुलकर्णी, राहुल गायकवाड, कपिल मकरंद, विजय खिस्ते, एडवोकेट अजित यादव, कार्तिक जाधव, आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी रुग्णांचे नातेवाईक आणि शिवसैनिक – युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.