सहकार भारतीच्या राष्ट्रीय पदाधिकारीपदी गोविंद तांबोळी यांची निवड
- अनिल जोशी
झरी,दि 20 :
राष्ट्रीय सहकार परिषदेचे अधिवेशन सध्या लखनऊ येथे चालू आहे या अधिवेशनामध्ये झरी गावाचे सुपुत्र गोविंद दत्तराव तांबोळी यांची पदाधिकारीपदी निवड झाली आहे.
गोविंद तांबोळी यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला झरी या ठिकाणी झाली तर उच्च शिक्षण शिवाजी महाविद्यालय परभणी या ठिकाणी झाले त्यानंतर त्यांनी हायकोर्ट मुंबई या ठिकाणी वकिलीचा व्यवसाय सुरू केला व त्यांची निवड आजा अधिवेशनामध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांच्या हस्ते त्यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्या मित्रमंडळी आप्त इष्ट तसेच गावकरी मंडळी यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे एक छोट्या गावातून राष्ट्रीय स्तरावर एका मुलाची निवड झाल्यामुळे झरी गावात मानाचा तुरा उंचावला आहे.