सदावर्ते सारखेच सर्व चालक,सेवकांना पीए करा..संभाजी ब्रिगेडची मागणी,जिल्हा परिषदेत चाललय काय ?
परभणी,दि 01 (प्रतिनिधी)ः
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्विय सहायक म्हणून कार्यरत असलेले वैजनाथ सदावर्ते यांनी नियम डावलुन व खोटी कादगपत्रे सादर करुन बढती घेतल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडने विभागीय आयुक्तांकडे केली आहे.सदावर्ते यांना निलंबीत करा अन्यथा जिल्हा परिषदेतील सर्वच चालक,सेवकांना त्यांच्याप्रमाणे पदोन्नती देऊन पीए करा अशी मागणी देखील या तक्रारीत करण्यात आली आहे.
वाचा सविस्तर निवेदन,
निवेदन देऊन संभाजी ब्रिगेडने याबाबत पोलखोल केली आहे
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांच्यासह मराठा सेवा मंडळाचे मंगेश भरकड,प्रल्हाद राठोड,राहुल जैस्वाल,अंगद मस्के,भरतसिंग टाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.