शेतकऱ्यांच्या वतीने आमदार डॉ. राहूल पाटील यांचा सत्कार
परभणी,दि 01 (प्रतिनिधी)ः नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात समृध्दी महामार्गासाठी जमिनी गेलेल्या शेतकºयांना रेडीरेकनरपेक्षा पाचपटीने मावेजा मिळवून देण्याचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल परभणी मतदार संघातील कुंभकर्ण टाकळी येथील शेतकऱ्यांच्यावतीने आमदार डॉ.राहूल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
नांदेड ते जालना जाणाºया समृध्दी महामार्गासाठी परभणी जिल्ह्यातील रहाटी, मुरूंबा, साबा, वांगी, संबर, सनपुरी, टाकळी कुंभकर्ण, कुंभारी आदी गावातील शेतकºयांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत़ सदर जमिनींचा मोबदला शेतकºयांना नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर मिळावा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकºयांच्यावतीने सातत्याने करण्यात येत होती़ याबाबत अनेक शेतकºयांनी आ़डॉ़पाटील यांची भेट घेवून शासनाकडे आपले गाºहाणे मांडण्याची विनंती केली होती़ त्यानुसार आ़डॉ़पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात जालना- नांदेड समृध्दी महामार्गाच्या संदर्भात लक्षवेधीद्वारे शासनाचे लक्ष वेधले़ त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथराव शिंदे यांनी आ़डॉ़पाटील यांच्या प्रश्नाची तात्काळ दखल घेत परभणी जिल्ह्यातील शेतकºयांना पाचपट मावेजा देण्यात येणार असल्याची घोषणा सभागृहात केली़ ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे परभणी जिल्ह्यातील शेतकºयांनी स्वागत करून सदर प्रश्न आ़डॉ़पाटील यांनी तडीस नेल्याबद्दल येथील शिवाजी नगर मधील आमदार संपर्क कार्यालयात शनिवार, दि़०१ जानेवारी रोजी सत्कार केला़ यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सदाशिवराव देशमुख, माजी सरपंच बबनराव सामाले, सुंदरराव देशमुख, एकनाथ देशमुख आदी उपस्थित होते़
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अजय देशमुख, प्रभाकर कदम, सुनील वसेकर, प्रभाकर राऊत, एकनाथ काचगुंडे, आनंदराव देशमुख, मनिष देशमुख, बाबुराव काचगुंडे, चंद्रकांत वसेकर, रमेश कदम, दस्तगीर कुरेशी, सुरेश देशमुख, दिपक देशमुख, अंकुश देशमुख, गंगाराम भोकरे, रामा वसेकर, कुलदीप वाघमारे, खाजा बाजी आदींनी प्रयत्न केले़ कार्यक्रमास शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता़