पूर्णा नगर परिषदेतर्फे घरोघरी लसीकरणाची मोहीम

0 171

पूर्णा, केदार पाथरकर – नगर परिषद पूर्णा तर्फे सर्व प्रभागात घरोघरी लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे ह्या मोहिमेत नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

मुख्यधिकारी नीतेशकुमार बोलेलू यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख गणेश रापतवर आणि त्यांचे सहकारी हे दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरोघरी भेटी देऊन लसीकरणाचे काम उत्तम प्रकारे करत असल्याचे दिसून आले त्यांच्या पथकात नजीब एन फारुख,मोगले एस एस,उज्वला आवटे सोनाजी खिलारे दीपक गवळी,मिलिद साबळे,आसिफ पठाण आदींचा समावेश असून त्यांचे याबद्दल पूर्णा शहरात कोतूक केले जात आहे.

error: Content is protected !!