पूर्णेत स्वा. सै. कै. स्व.दाजीसाहेब कदम प्रतिष्ठान तर्फे सेवानिवृत्ती निमित्त डॉ. हरिभाऊ पाटिल यांचा भव्य सन्मान सोहळा
पूर्णा, केदार पाथरकर – पूर्णेकरांनी सर्वसामान्य शिक्षकाचा सेवा गौरव करुन त्यांच्या सन्मानाचे पर्वच सुरू केले आहे.राष्ट्र घडवण्याचे काम खऱ्या अर्थाने शिक्षकच करत असतात पूर्णेतील डॉ. हरीभाऊ पाटील यांच्यासारखे एक प्रयोगशील शिक्षक, कल्पक मुख्याध्यापक यांचा त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या पूर्णेकरांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. असे गौरवोद्गार सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे यांनी स्वा.सै. कै.स्व.दाजीसाहेब कदम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलताना काढले.
पूर्णा शहरात स्वा. सै. कै. स्व.दाजीसाहेब कदम प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दि.१ जानेवारी रोजी शहरातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विद्याप्रसरणी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.हरिभाऊ पाटील यांच्या कार्य गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉ.नांदेडे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम हे होते तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून वेदमूर्ती उमेशमहाराज टाकळीकर, खा. संजयजी जाधव, डॉ.दत्तात्रयजी वाघमारे,डॉ. द्वारकादासजी झंवर,रामनारायणजी मुंदडा गुरूजी, प्राचार्य मोहनराव मोरे, गटनेते उत्तमभैय्या खंदारे, पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ धोंडगे, सुधाकर खराटे, शेख महेबुब गुरूजी, पत्रकार संतोष धारासूरकर, साहेबरावजी कदम,प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, कार्यवाह संतोषराव एकलारे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने प्रास्ताविक कार्यवाह संतोषजी एकलारे यांनी केले.सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ. हरीभाऊ पाटील यांची ग्रंथतुला करुन त्यांचा व पत्नी सौ.भक्ती पाटील यांचा शाल,श्रीफळ व माननपत्र देऊन गौरविण्यात आले.धनगर टाकळी ग्रामस्थांच्या वतीने खा.संजय जाधव, डॉ हरिभाऊ पाटील यांचा मानाची घोंगडी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.मानपत्राचे वाचन डॉ.दिलीप शृंगारपुतळे यांनी केले.
खासदार संजय जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले की,डॉ. हरीभाऊ पाटील यांनी पूर्णेच्या शैक्षणिक क्षेत्रासह पत्रकारिता,सामाजिक रेल्वेच्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण शैलीतून समोर आणण्याचे काम केले. यापुढील काळात त्यांनी आपले योगदान देऊन समाजाला समृद्ध करावे यासाठी ते जे प्रयत्न करतील त्यासाठी आवश्यक त्या मदतीसाठी मी खंबीरपणे पाठीशी असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आपल्या भाषणात डॉ. हरीभाऊ पाटील यांनी शहरातील अनेक सुसंस्कृत उच्च शिक्षा विभुती विद्यार्थी घडविण्याचे काम केले.त्यासोबतच पत्रकारिता, सामाजिक कार्य, शैक्षणिक शैत्रातील कार्यावर प्रकाश टाकला.असे मौल्यवान गुरु आम्हाला लाभल्याचे भाग्य आम्हाला मिळाले असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रस्तावित नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे सुत्रसंचलन जगदीश जोगदंड, आभार प्रदर्शन इंजि नागनाथ कापूसकरी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत शिंदे,विक्रम (विक्की) कदम, श्याम कदम, अँड राजेश भालेराव,गजानन हिवरे,शंकर गलांडे,अतुल शहाणे, सचिन (पप्पू) कदम, विशाल चितलांगे, अशोक अग्रवाल,पप्पू आदींनी परिश्रम घेतले.