सीईओ शिवानंद टाकसाळेंनी प्रशासक पदाचा पदभार स्विकारला
परभणी, प्रतिनिधी – जिल्हा परिषदेतील जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा सेवा कार्यकाळ संपुष्टात आल्याने शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासक पदाचा पदभार सोमवार दि 21 मार्च 2022 रोजी स्विकारला.
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासक पदाचा पदभार जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती मध्ये स्विकारला असून यापुढील कामकाज नवीन इमारती मधून करण्यात येणार आहे.
यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रावजी सोनवणे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विद्यासागर पाटील, स्वच्छ भारत मिशनचे संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह आदींनी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी प्रशासन पदाचा पदभार स्विकारल्या बद्दल अभिनंदन केले.
जिल्हा शल्य चिकित्सक यांना कोविड सेंटरचे साहित्य स्थलांतरित करण्याच्या सीईओंनी दिल्या सूचना
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने व कोरोना रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी जिल्हा परिषदेची नवीन इमारत अधिग्रहित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार परिषदेच्या नवीन इमारतीमधील कोविड सेंटरचे सर्व साहित्य तात्काळ स्थलांतरित करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना दिल्या आहेत.
शासनाच्या पुढील सूचना प्राप्त होई पर्यंत जिल्हा परिषदेच्या प्रशासक पदाचा पदभार मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे असणार आहे