पालम खरेदी-विक्री संघावर रासपचा झेंडा; अध्यक्षपदी डॉ. उंदरे तर उपाध्यक्षपदी बाबर

0 50

पालम, प्रतीनिधी – तालुका खरेदी-विक्री संघावर राष्ट्रीय समाज पक्षाने झेंडा फडकाविला. मंगळवारी (ता.22) या संघाच्या अध्यक्षपदी डॉ. रामराव उंदरे तर उपाध्यक्षपदी विश्वांबर बाबर यांची अविरोध निवड झाली. लागलीच फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

पालम खरेदी-विक्री संघाची निवडणूक 24 जानेवारी रोजी जाहीर झाली होती. ती आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली रासपचे उपाध्यक्ष गणेशराव रोकडे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली. त्यांच्या व्यतिरीक्त प्रतिस्पर्धी पॅनलकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. म्हणून सर्व 19 जागा अविरोध निवडून आल्या होत्या. तदनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. सहाय्यक निबंधक संदीप तायडे पिठासीन अधिकारी होते. त्यांना निबंधक कार्यालयाचे अव्वल कारकून विजय देखने, सचिव महादेव सोन्नर यांची सहाय्य केले. सभेला ज्ञानोबा पैके, वामनराव बरडे, नितीन फाजगे, रामेश्वर लवटे, गोविंद बंडगर, किशनराव क-हाळे, भारत कदम, अच्युतराव क-हाळे, मारोती धुळगुंडे, ज्ञानोबा रोकडे, विजय घोरपडे, ताराबाई क-हाळे, पंचफुला डुकरे, तुकाराम पाटील, उत्तमराव गिनगीने, विश्वनाथ हत्तीहंबीरे यावेळी उपस्थित होते. दोन्ही पदासाठी प्रत्येक एकमेव अर्ज दाखल झाले. म्हणून सर्वानुमते अध्यक्षपदी डॉ. रामराव उंदरे आणि उपाध्यक्षपदी विश्वांबर बाबर यांची बिनविरोध निवड झाली. निवडीचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करून फटाक्याची आतषबाजी करण्यात आली निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांसह संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प. सदस्य किशनराव भोसले, जिल्हाध्यक्ष एडवोकेट संदिप अळनुरे प्रभारी माधवराव गायकवाड, नगरसेवक बालासाहेब रोकडे, सरपंच माधवराव गिनगीने, अप्पासाहेब केरवाडीकर, सुभाष कदम, गणेशराव घोरपडे, उबेदखाँ पठाण,आजीम पठाण, रहीमतुलाखाँ पठाण, गफार खुरेशी, मोबीन खुरेशी, शेख गौस, गजानन रोकडे, गणेश हत्तीहंबीरे,बाबासाहेब एंगडे, गणेश घोरपडे, प्रल्हाद कराळे,शामराव काळे,नागनाथअप्पा खेडकर, विष्णू आवरगंड यांच्यासह आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!