Breaking : मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला ईडीचा मोठा दणका…

0 129

ठाणे – ठाण्यात ईडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकरांवर मोठी कारवाई करण्यात आलीय. पुष्पक बुलियन प्रकरणात श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीनं सील केल्यात. श्रीधर पाटणकरांच्या एकूण 6.45 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणलीय. श्रीधर पाटणकरांचं हे प्रकरण पुष्पक बुलियन कंपनीशी संबंधित असून, यात आतापर्यंत 6.45 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलीय.

आज सकाळपासून ईडीचे धाडसत्र (ED raid) सुरू आहे. यात मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि झालही तेच आहे. कारण आता मुख्यमंत्र्यांच्या (Cm uddhav thackeray) मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे, ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. श्रीधर पाटणकर (Shridhar patankar) ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय. यात जवळपास 6.45 कोटींच्या सपत्तीला टाळा लावण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय. महाराष्ट्रात सध्या ईडी अॅक्टिव्ह मोडवर आहे. पुष्पक बिलीयन फसवणूक प्रकरणात ईडीने हा मोठा दणका दिला आहे. यात ईडीने आधीही कोट्यवधी रुपयांची माहिती सोर आली आहे. यात ईडीने आधीच मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार हा तपास सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. यात अनेक मोठ्या कारवाई करण्यात आल्या आहेत.

या कारवाईतच श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. ही कंपनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)

error: Content is protected !!